Good News | बीडकरांचे स्वप्न पुर्ण, आष्टी ते मुंबई रेल्वे धावणार, फेब्रुवारी महिन्यात रेल्वे धावण्याची शक्यता !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर- बीड – परळी या रेल्वेमार्गाच्या उभारणीला गती आली आहे. अहमदनगर ते आष्टी या लोहमार्गाचे काम पुर्ण होऊन हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी पार पडली. प्रतिक्षा होती ती रेल्वे कधी धावणार याची.गेल्या अनेक दशकांपासून बीडकरांना रेल्वेची प्रतिक्षा होती. लवकरच बीडकरांचे हे स्वप्न पुर्ण होणार आहे. लवकरच आष्टी ते मुंबई रेल्वे धावणार आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात आष्टी ते मुंबई नियमित रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे याच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून समजत आहे.

बीड जिल्ह्यात अहमदनगर-परळी या 261 किलोमीटर रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान आष्टी ते अहमदनगर 60 किमीचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. आता 4 फेब्रुवारीच्या दरम्यान हे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच बीडकरांचे रेल्वे प्रवासाचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

दरम्यान आष्टी ते मुंबई रेल्वे सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या भागातील जनतेचे अनेक दशकांचे स्वप्न पुर्ण होणार आहे.