Subhash Dudhal news : रेल्वेरुळावर आढळला पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह , पोलीस दलात उडाली मोठी खळबळ 

Subhash Dudhal news : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून या घटनेत एका पोलीस निरीक्षकाचा (PI Subhash Dudhal Pune) मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. ही घटना बीडच्या परळी (Parli) शहरातून समोर आली आहे. या घटनेने राज्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. (Subhash Dudhal suicide news)

beed Parli latest news, Subhash Dudhaal news, Police inspector's body found on railway track, What is reason for  suicide of Police Inspector Subhash Dudhaal? find out

परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) (Subhash Bhimrao Dudhal) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी रात्री दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वेरुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांना परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन, पंचनामा करून परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ हे परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही.

सुभाष भीमराव दुधाळ हे पुण्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुण्यात बदली झाली होती. त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यात आढळून आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही आढळून आली आहे.

beed Parli latest news, Subhash Dudhaal news, Police inspector's body found on railway track, What is reason for  suicide of Police Inspector Subhash Dudhaal? find out

दुधाळ यांनी आपले आयुष्य संपवण्याआधी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी ही सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे. कौटुंबिक कारणातून टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सुभाष दुधाळ यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधे त्यांनी कारण सांगितलं. Subhash Dudhal हे पुणे CID च्या EOW विभागात पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते. पोलीस दलातील अंतर्गत कलहाचंही त्याच्यावर प्रेशर होतं अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

एका प्रकरणात,चुकीचा तपास आणि कर्तव्यात कसूर केल्याचा, त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. हा ठपका चुकीचा असल्याची चर्चा होतीच, त्यामुळेही सुभाष दुधाळ अस्वस्थ होते. याशिवाय कौटुंबिक कारण असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.