Ausa Accident News : भरधाव कार घुसली हॉटेलमध्ये, भीषण अपघातात तिघा जणांचा मृत्यू, तर 14 वर्षीय मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त

Latur Ausa accident news today : लातूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे, या घटनेत  रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल मध्ये कार घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून हॉटेलमध्ये बसलेल्या एका 14 वर्षीय मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्याने आपले दोन पाय गमावले आहेत.हा भीषण अपघात औसा येथे घडला आहे. या घटनेचा  सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

speeding car rammed into hotel, two people died in horrific accident, 14-year-old boy's life was ruined, Latur Ausa accident news today

हायवे क्रमांक 361 वर सीएनजी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलात हैदराबादहून लातूरकडे जाणारी भरधाव कार घुसल्याची घटना आज घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि कार थेट हॉटेलमध्ये घुसली.

speeding car rammed into hotel, two people died in horrific accident, 14-year-old boy's life was ruined, Latur Ausa accident news today

या अपघातात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 14 वर्षीय मुलाचे दोन्ही पाय तुटले आहेत.ओमकार कांबळे असं या मुलाचं नाव आहे. तर कारमधील 2 जण जागीच ठार झालेत. तसंच कार मधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. 

speeding car rammed into hotel, two people died in horrific accident, 14-year-old boy's life was ruined, Latur Ausa accident news today

सहा जण हैदराबादहून कारमधून लातूरला जात असताना समोर आलेल्या रिक्षाला चुकवण्याच्या नादात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलात घुसली. सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार या हॉटेलवर आदळताना दिसत आहे.

ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.हॉटेल मधील कामगार ओमकार कांबळे हा हॉटेल समोर बसलेला दिसत आहे. तर एक इसम उभा असलेला दिसत आहे. त्याचवेळी एक भरधाव क्रेटा कार हॉटेलमध्ये घुसली असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

speeding car rammed into hotel, two people died in horrific accident, 14-year-old boy's life was ruined, Latur Ausa accident news today

क्रेटा कार हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा आवाज झाला. या अपघातामुळे धुराचे मोठे लोट उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी जखमींना मदत केली. या अपघातात दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

अपघातग्रस्त हॉटेल पाच ते सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. तसेट हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ओमकारचा हा कामावरील पहिलाच दिवस होता. दुर्दैवाने हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. या भीषण अपघातात लातूरचे राजाजी टेलर्सचे संचालक वाजीद खान पठाण आणि राजासाबजी टेलर्सचे संचालक सोहेल शेख आणि हॉटेलमधील कामगार अशोक कांबळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमींना पुढील उपचारांसाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान ओमकार कांबळे या तरुणाचा सुद्धा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.