जामखेड : ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या आर्यन गायकवाडने गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला.

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड पंचायत समिती व जामखेड तालुका गणित, विज्ञान, शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान, गणित, पर्यावरण प्रदर्शन 2022-23 मध्ये जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन शिवाजी गायकवाड याने 1 ते 5 गटामध्ये (गणित) जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

Aryan Gaikwad of Oxford English School bagged first rank in Mathematics Science Environment Exhibition

जामखेड तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकतेच तालुकास्तरीय गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते पाचवी (गणित) या गटात जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन शिवाजी गायकवाड हा विद्यार्थी सहभागी झाला होता. आर्यन याने ‘सोप्या पध्दतीने वर्ग करणे‘ हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जवळा येथे पार पडलेल्या गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनात ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन शिवाजी गायकवाड याने गणित प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पो, गटशिक्षण अधिकार कैलास खैरे साहेब, तसेच तालुका गणित-विज्ञान संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

आर्यन शिवाजी गायकवाड या विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा संचालक प्रा. कैलास माने (सर), सौ. वर्षा माने, प्रिन्सिपल आरोरा व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन केले आहे.