जामखेड : तालुकास्तरीय गणित – विज्ञान- पर्यावरण प्रदर्शनाचा निकाल जाहीर, वाचा कोण ठरले विजते ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड पंचायत समिती व जामखेड तालुका गणित, विज्ञान, शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजित विज्ञान, गणित, पर्यावरण प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला आहे.

Jamkhed Taluka Level Maths Science Environment Exhibition Result Announced, Read Who Has Won

जामखेड तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात 10 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत तालुकास्तरीय गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ 12 जानेवारी रोजी संपन्न झाला. विजेत्यांना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि गटशिक्षण अधिकारी कैलास खैरे आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

पहिली ते पाचवी (विज्ञान)

1) मानवी प्रभाकर हजारे – पाॅलीहाऊस – छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा
2) श्रेयस बाळासाहेब बोराटे – ॲटोमॅटिक वाॅटर जार – भैरवनाथ विद्यालय, हळगाव
3) स्नेहा अंबादास गाडे – धुम्रपान व फुप्फुस- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवदैठण
4) धनश्री एकनाथ चव्हाण- आपोआप चालू होणारा पंखा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरवाडी

पहिली ते पाचवी (गणित)

1) आर्यन शिवाजी गायकवाड – सोप्या पध्दतीने वर्ग करणे – ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल, जामखेड
2) अक्षरा सुदाम शिंदे – संख्याशिवाय बेरीज – छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा
3) कृष्णा बबन मोरे – गणिताचा गाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोतेवाडी
4) शिवम रामचंद्र वारे – संख्या चाळणी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रत्नापुर

सहावी ते आठवी (विज्ञान)

1) स्नेहा शिवाजी लटपटे – हेल्थ अँड क्लिननेस  – कन्या विद्यालय, जामखेड
2) अरविंद प्रविण गायकवाड  – अर्थक्विक अलार्म  – ल.ना.होशिंग विद्यालय, जामखेड
3) लक्ष्मी लहू वराट – नैसर्गिक स्रोतांचा वापर व प्रदुषण टाळणे, साकेश्वर विद्यालय, साकत
4) यश लहू कोल्हे – बिनकोंबडीचे अंडी उडवणारे यंत्र, छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा

सहावी ते आठवी (गणित)

1) आशिष शिवाजी कोल्हे – जन्म तारखेवरून वय ठरविणे – न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी
2) आदित्य साहेबराव कापसे – फॉर्म्युला ट्रिक, भैरवनाथ विद्यालय, हळगाव
3) तन्वी शंकर ढगे – टाईप ऑफ अंगल – छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा

नववी ते बारावी (विज्ञान)

1) रोहन शंकर कोल्हे – युरीन प्लांट – ल.ना.होशिंग विद्यालय, जामखेड
2) मयुर बजरंग नन्नवरे – ऑनलाईन शेती – अरणेश्वर विद्यालय, अरणगाव
3) गणेश बाजीराव सोनार – स्मार्ट होम – खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा

नववी ते बारावी (गणित)

1) अस्मिता आबासाहेब कापसे – फॉर्म्युला ट्रिक – भैरवनाथ विद्यालय, हळगाव
2) सृष्टी हनुमंत जायभाय – शंकु व वृत्तचित्तीचे घनफळ संबंध – खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा
3) यश ज्ञानेश्वर गिते – वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ काढण्याची सोप्पी पध्दत

पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षक गट ( शैक्षणिक उपकरण निर्मिती)

1) प्रविण दत्तात्रय शिंदे – लॅब इन हॅन्ड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वनवेवस्ती
2) बाळासाहेब अंबादास औटे – हसत खेळत शिक्षण – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रत्नापुर
3) ए. आर. गाडे – लिहा पुसा हसा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवदैठण

9 वी ते 12 वी माध्यमिक शिक्षक गट ( शैक्षणिक उपकरण निर्मिती )

1) विकास युवराज पाचारणे – ब्लाॅक वेबसाईट क्यू आर कोड निर्मिती  – ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड
2) महादेव नरसिंग मत्रे – गणित शैक्षणिक साहित्य  – साकेश्वर विद्यालय, साकत
3) सुर्यकांत मधुकर कदम – शैक्षणिक साहित्य निर्मिती – जिजामाता माध्यमिक विद्यालय, घोडेगाव

प्रयोगशाळा परिचर गट

1) मारूती बाबा जगताप – सोलार एनर्जी – आणखेरीदेवी विद्यालय, फक्राबाद
2) नागनाथ मारूती शिंदे – सौर ऊर्जा – चन्नप्पा विद्यालय, पिंपळगाव उंडा