Ajit Pawar Live Updates: अजित पवारांच्या बंडानंतर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले हे पाहून जीव तुटतो.. राज ठाकरेंनी कुणावर साधला निशाणा ?

मुंबई, 2 जूलै 2023, जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावत शिवसेना भाजप युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी चालू पाच वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात रंगलेल्या या सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरु झाला आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ajit Pawar Live Updates,Raj Thackeray's big reaction after Ajit Pawar's rebellion, he said, "It breaks my heart to see this.. Who did Raj Thackeray target?"

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर खळबळ.उडालीच शिवाय देशातही या घटनेचे हादरे बसले. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार बंडावर आपली भूमिका मांडत तोफ डागली आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला,

राज ठाकरे पुढे म्हणाले, ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा.सवाल.उपस्थित करत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.