Ajit Pawar Live Updates : महाराष्ट्रात काका विरूध्द पुतण्या सत्तासंघर्षाचा नवा अध्याय?, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांनी केला मोठा दावा !

मुंबई, 2 जूलै 2023, जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द शिंदे सत्तासंघर्ष अजूनही शमलेला नसताना आता महाराष्ट्रात  काका विरूध्द पुतण्याने हा नवा सत्तासंघर्ष उभा राहिला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रविवारी बंड करत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवारांसह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला.

Ajit Pawar Live Updates, New chapter of uncle vs nephew power struggle in Maharashtra?, Ajit Pawar made big claim as soon as he took oath as Deputy Chief Minister,

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योरापांचा कलगीतुरा रंगला होता.पहाटेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता अजित पवार यांनी दुपारी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला.

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते,”

“नऊ वर्षांपासून मोदी सरकार चांगले काम करीत आहे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे, त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल,” असे अजित पवार म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला.जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.