Ajit Pawar Live Updates : अजित पवारांच्या बंडात तीन आमदारांना लागली लाॅटरी, तर शिवसेनेच्या त्या आमदारांचा पुरता हिरमोड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा 2 जूलै 2023 : Ajit Pawar Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीशी युती नको म्हणत शिवसेनेत बंड पुकारले होते, पक्षावर दावा केला होता, कायदेशीर लढाईत पक्षही त्यांच्याकडे आला. सत्तासंघर्षाचे हे नाट्य वर्षभर रंगले. शिवसेना भाजपचे सरकार (Shiv Sena BJP Government) सत्तेवर येऊन वर्ष होत नाही तोच पुन्हा बंडखोरीची घटना घडली आहे.त्याचा तडाखा राष्ट्रवादीला बसलाय.राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात रविवारी उभी फुट पडली. अजितदादांनी पक्षावर दावा सांगितलाय. कायदेशीर लढाई होणार नाही असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत. एकुणच या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Ajit Pawar Live Updates, In Ajit Pawar's rebellion three MLAs won lottery, Displeasure among those MLAs of Shiv Sena, shivsena bjp ncp government maharashtra,

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांना 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी चालू पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा शपथ घेत नवा इतिहास रचला आहे. अजित पवारांच्या या बंडाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले प्रफुल्ल पटेल, छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ याही नेत्यांनी अजित पवारांच्या बंडात सहभागी होत मंत्रीपद पदरी पाडून घेतलं आहे.

http://jamkhedtimes.com/ajit-pawar-live-updatesraj-thackerays-big-reaction-after-ajit-pawars-rebellion-he-said-it-breaks-my-heart-to-see-this-who-did-raj-thackeray-target/

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार यावर सर्वांचेच लक्ष होते. अनेकदा अनेक तारखा चर्चेत आल्या पण मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून जेव्हा जेव्हा चर्चा व्हायच्या, बातम्या यायच्या तेव्हा मग शिंदे गट आणि भाजपातील नेते मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसायचे. मंत्रिमंडळ विस्तारात अमूक नेत्याला संधी मिळणार यावर मिडीया ट्रायल व्हायची, माध्यमात ज्यांची नावं झळकायचे त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते जोशात यायचे. सोशल मिडीयावर स्टेटस टाकले जायचे. लवकरच लाल दिवा.

http://jamkhedtimes.com/ajit-pawar-live-updates-ncp-joins-shinde-fadnavis-government-9-leaders-of-ncp-take-oath-as-ministers-ajit-pawars-rebellion-stirs-excitement-in-maharashtra/

मागील दोन तीन दिवसांपुर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार अश्या बातम्या सुरु झाल्या होत्या, तेव्हा शिवसेना आणि भाजपातील इच्छुकांनी पुन्हा मोर्चेबांधणी हाती घेतली. शिवसेनेच्या काही आमदारांनी लाल दिवा फिक्स असे भाषणे ठोकली. पण रविवारी या सर्वांनाच कोमात लावणारी घडामोड समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक खेळत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सरकारमध्ये सामावून घेतले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले. तसेच अजित पवार गटांतील 8 आमदारांनाही मंत्री केले.वर्षभरापासून मंत्रिपदाची आस बाळगून असलेल्या शिवसेनेच्या त्या आमदारांचा पुरता हिरमोड झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला संधी न मिळाल्याने अनेक आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

आमदार आदिती तटकरे यांची लागली लाॅटरी

शिवसेना भाजप सरकार सत्तेवर येऊन वर्ष झाले होते. सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रीपदाची संधी दिली गेली नव्हती. त्यावरून सरकारवर टीका होत होती. मात्र रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तटकरे ह्या सरकारमधील एकमेव महिला मंत्री असणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या. दुसर्‍यांदा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली. शिवसेना व भाजपातील महिला नेत्यांना मंत्रिपदासाठी अजून प्रतिक्षाच करावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

http://jamkhedtimes.com/ajit-pawar-live-updates-new-chapter-of-uncle-vs-nephew-power-struggle-in-maharashtra-ajit-pawar-made-big-claim-as-soon-as-he-took-oath-as-deputy-chief-minister/

रविवारी अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष म्हणून शिवसेना भाजप युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात राष्ट्रवादीच्या तीन आमदारांची लाॅटरी लागली आहे. कधीही चर्चेत नसलेल्या अनिल पाटील, संजय बनसोडे व धर्मराज बाबा आत्राम या तीन आमदारांना लाल दिवा मिळाला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची लाॅटरी लागलेले पाटील बनसोडे व आत्राम कोण आहेत जाणून घेऊयात.

आमदार अनिल पाटील

अनिल पाटील यांना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण खातं देण्यात आलं आहे. अनिल पाटील यांना अजित पवार गटाचं मानलं जातं, कारण २०१९ च्या सकाळच्या शपथविधीच्या वेळेसही ते अजित पवारांच्या पाठीशी होते. अनिल पाटील म्हणजे जळगाव जिल्ह्यातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. खरं तर अनिल पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपमधूनच केलेली. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नंतर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा अमळनेरमधून उभे राहिले होते मात्र त्यांचा पराभव झालेला. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. आणि अचानक त्यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागली असं आता म्हणावं लागेल. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यास आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यानंतर तिसरे मंत्री लाभलेत.

आमदार संजय बनसोडे

उदगीरचे आमदार म्हणजे संजय बनसोडे. महाविकास आघाडीचं सरकार बनण्यापूर्वी गायब असणाऱ्या एका आमदाराचा शोध जेव्हा सुरू होता तेव्हा चर्चेत आलेलं नाव होतं, संजय बनसोडे यांचं. पुन्हा अजित पवार न रिचेबल झाले तेंव्हाही संजय बनसोडे यांनी अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. कायम दादानिष्ठ अशी ओळख असलेलं संजय बनसोडे महाविकास आघाडीत पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री झालेले, आणि आत्ताही त्यांना त्यांचं बक्षीस मिळालं आहे.

संजय बनसोडे यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासून झालेली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी कामाची सुरुवात केली. अजित पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून पराभूत झालेले मात्र २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

आमदार धर्मरावबाबा आत्राम

अहेरी विधानसभेचे आमदार. (त्यांनी आदिवासी कल्याण मंत्री पद). गडचिरोली-चिमूर लोकसभा आपणच लढणार यावर काँग्रेस ठाम होती तर ही लोकसभा लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच गडचिरोलीच्या अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम हे तयार होते.लोकसभा लढवण्याचा मनसुबा त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही. ते आपण ही लोकसभा लढविणार हे सातत्याने सांगत आले आहेत. त्यांनी आपली अहेरी विधानसभा त्यांची कन्या जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्या कन्येला उभे करणार आणि स्वतः लोकसभेला उभं राहणार असा त्यांचा प्लॅन आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली आहे. त्यातही मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून पराभूत झालीय. तरीही काँग्रेस या लोकसभेवरचा आपला हक्क सोडत नव्हती. अशा स्थितीत धर्मरावबाबा आत्राम भाजपकडे तिकीट मागू शकतात अशी चर्चा होती मात्र ती वेळच आली नाही. धर्मरावबाबा आत्राम यापूर्वीही भाजपमध्ये जाऊन आले आहेत. मात्र यावेळेस त्यांनी अजित पवारांना पाठिंबा देत आपला मार्ग निवडलेला आहे.

राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ?

1) अजित पवार – Ajit Pawar
2) छगन भूजबळ – Chhagan bhujbal
3) दिलीप वळसे पाटील – Dilip Walse Patil
4) हसन मुश्रीफ – Hasan mushrif
5) धनंजय मुंडे – Dhananjay Mundhe
6) आदिती तटकरे – Aaditi Tatkare
7) अनिल पाटील – Anil Patil
8) संजय बनसोडे -Sanjay Bansode
9) धर्मरावबाबा आत्राम – Dharmarao Baba Atram