Ajit Pawar Live Updates : राष्ट्रवादी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी, राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, अजित पवारांच्या बंडाने राज्यात उडाली खळबळ

मुंबई, 2 जूलै 2022 ; राज्याच्या राजकारणात रविवारी.मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीचा एक गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे

Ajit Pawar Live Updates, NCP joins Shinde Fadnavis government, 9 leaders of NCP take oath as ministers, Ajit Pawar's rebellion stirs excitement in maharashtra

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार यांनी पाच वर्षांत तीनदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.