Ajit Pawar Live Updates : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप, अजित पवार होणार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई, 2 जूलै 2022 ; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.  अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा  अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar Live Updates, Earthquake again in maharashtra politics, Ajit Pawar to be Deputy Chief Minister, Nationalist congress party on the verge of split?

अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.  राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे. राजभवनात अनेक नेते दाखल झाले आहेत. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे यावरून बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशातच आत अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीचे अनेक आमदार व जिल्हाध्यक्ष उपस्थितीत होते.