NCP crisis latest updates : बंडानंतर अजित पवार गटाला पहिला धक्का, शपथविधीला उपस्थित राहिलेल्या नेत्याने घेतला मोठा निर्णय, दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो म्हणत केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा !

मुंबई, 03 जूलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. या भूकंपाने राष्ट्रवादीचा मजबुत बालेकिल्ला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत थेट काकाविरूध्द दंड थोपटले. राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रविवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या ट्विटने सोमवारी अजित पवारांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Amol Kolhe News, first blow to Ajit Pawar's group after rebellion,NCP leader who attended Ajit Pawar's swearing-in took big decision, Jab Dil Aur Dimag Mein Jung Ho Dil Ki Suno - MP Dr Amol Kolhe,

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – राष्ट्रवादी- काँग्रेस अशी महाविकास आघाडी बनत असताना पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अजित पवारांचे हे बंड थोपवण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यशस्वी ठरले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. पण वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेना पक्षात उभी फुट पडली. शिवसेना उध्दव ठाकरेंच्या हातून गेली. शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष पुर्ण होताच राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी झालाय. आता काका विरूध्द पुतण्या (शरद पवार विरूध्द अजित पवार) हा नवा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला आहे.

पवार कुटूंबात उभी फुट पडली आहे. अजित पवार विरूध्द शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार अशीच विभागणी झालीय. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा संघर्ष आता तीव्र बनणार आहे. राष्ट्रवादीचा बाॅस कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान रविवारी राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला शिरूरचे खासदार डाॅ अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यांनी सोमवारी केलेले ट्विट चर्चेत आले आहे. तत्पूर्वी डाॅ अमोल कोल्हे, आमदार सुनिल शेळके, सुधीर मुनगंटीवार व दिलीप वळसे पाटील या चार नेत्यांचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतू आज डाॅ अमोल कोल्हे यांनी केलेले ट्विट सर्वांच्याच भूवया उंचावणारे ठरले आहे. 24 तासाच्या आत त्यांनी आपला निर्णय फिरवत शरद पवारांना साथ.देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं आहे की, ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है . पर दिल कभी नहीं। मी साहेबांसोबत.’ असे लिहीत सोबतीला एक व्हिडीओ त्यांनी जोडला आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (amol kolhe tweet)

खासदार अमोल कोल्हे यांचं ट्वीट रिट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी मोहरा परत आणल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. ‘पहिला मोहरा परत..!’ असं ट्वीट करून शरद पवारांकडून घरवापसी सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता शरद पवार की अजित पवार असा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Jitendra Awhad tweet)

दरम्यान राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या फुटीच्या वादळात शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. या गटात कोणत्या आमदारांचा समावेश आहे याचीच राज्यात चर्चा रंगली आहे. सध्या समोर येत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. परंतू याबाबत अजून कोणतीच अधिकृत घोषणा अजित पवार गटाकडून करण्यात आलेली नाही. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार गुन्हे गटाकडे 27 – 27 आमदार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. शरद पवार व अजित पवार गटाची यादी पाहूयात.

अजित पवारांसोबत असलेले आमदार

1) अजित पवार,
2) छगन भूजबळ
3) दिलीप वळसे पाटील
4)हसन मुश्रीफ,
5) धनंजय मुंडे,
6) आदिती तटकरे,
7) अनिल पाटील,
8) संजय बनसोडे,
9) धर्मरावबाबा आत्राम
10) माणिकराव कोकाटे (सिन्नर),
11) नरहरी झिरवाळ (दिंडोरी),
12) सुनील भुसारा (विक्रमगड),
13) अतुल बेनके (जुन्नर),
14) संग्राम जगताप (अहमदनगर),
15) आशुतोष काळे (कोपरगाव),
16) चेतन तुपे (हडपसर),
17) सुनील शेळके (मावळ),
18) दिलीप मोहिते (खेड आळंदी),
19)  दत्तात्रय भरणे (इंदापूर),
20) दौलत दरोडा (शहापूर),
21) शेखर निकम (चिपळूण),
22) सरोज अहिरे (देवळाली),
23) किरण लहाने (अकोले),
24) अशोक पवार (शिरूर),
25) संजय बनसोडे (उदगीर),
26) सुनील टिंगरे (वडगाव शेरी),
27) निलेश लंके (पारनेर)

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार

1) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा),
2) राजेश टोपे (घनसावंगी),
3) अनिल देशमुख (काटोल),
4) जयंत पाटील (इस्लामपूर),
5) बाळासाहेब पाटील (अहमदपूर),
6) शामराव पाटील (कराड उत्तर),
7)प्रकाश सोळंके (माजलगाव),
8) राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा),
9) नवाब मलिक (अणुशक्ती नगर),
10) प्राजक्त तनपुरे (राहुरी),
11) बाळासाहेब आजबे (आष्टी),
12) राजू कारेमोरे (तुमसर),
13) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव),
14) दीपक चव्हाण (फलटण),
15) अशोक पवार (शिरूर),
16 ) मकरंद जाधव (वाई),
17) चंद्रकांत नवघरे (बसमत),
18) इंद्रनील नाईक (पुसद),
19) मानसिंग नाईक (शिराळा),
20) नितीन पवार (कळवण),
21) रोहित पवार (कर्जत जामखेड),
22) राजेश पाटील (चंदगड),
23) सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ),
24) दिलीपराव बनकर (निफाड),
25) यशवंत माने (मोहोळ),
26) बबनराव शिंदे (माढा)
27) संदीप क्षीरसागर (बीड)