कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा : म्हणाले आठवड्यातून एक दिवस

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिंदे सरकारमधील मंत्री आता कामाला लागले आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत एक मोठी घोषणा केला आहे. (Agriculture Minister Abdul Sattar’s big announcement regarding farmers, government will visit farmers village for one day in week)

Agriculture Minister Abdul Sattar big announcement regarding farmers, government will visit farmers village for one day in week

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची विभागीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आणि कृषी विभागाकडून सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.

राज्यातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्यातील एक दिवस अधिकाऱ्यांसह शेताच्या बांधावर जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यासाठी मी माझ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. यासाठी दर आठवड्याला एका गावात आम्ही जाणार आहोत.

संपुर्ण दिवस शेतकरी बांधवांसोबत थांबून आम्ही त्यांच्या समस्या जाणून तर घेणारच आहोत, शिवाय कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देणार आहोत. जो पर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार नाही तोवर शेतकऱ्यांच्या समस्या कळणार नाहीत म्हणून बांधावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.

राज्यात शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. शेेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवणे हे आमचे लक्ष आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊले उचलत आहोत. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत ? याच्या कारणांचा शोध थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार आहोत असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यावेळी बोलताना म्हणाले.