जामखेड तालुक्यात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते पार पडले जामखेड तहसील कार्यालयात ध्वजारोहण

जामखेड टाइम्स डाॅट काॅम । सत्तार शेख । दीडशे वर्षे पारतंत्र्यात असलेला आपला भारत देश स्वतंत्र व्हावा, यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाची बाजी लावली, अनेक क्रांतिवीर शहीद झाले.त्यांनी मिळवून दिलेलं हे स्वातंत्र्य तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.

75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन जामखेड तालुक्यात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा मोहिमेमुळे संपुर्ण तालुका तिरंगामय झाला होता. आज 15 ऑगस्ट रोजी 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जामखेड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला

यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय कांबळे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कृषी अधिकारी अशोक शेळके, वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, महावितरणचे अभियंता गावीत, कदम, जलसंपादाचे उपविभागीय अभियंता शिंदे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर,

निवासी नायब तहसीलदार पाचरणे, सर्व मंडळ अधिकारी, जामखेडचे तलाठी विश्वजीत चौगुले, दुय्यम निबंधक पाटेकर, सर्व तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच आजी माजी सैनिक, पोलिस दल, जेष्ठ नागरिक आणि सर्व पक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते, नागरिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फौजदारी लिपीक रमेश कांबळे यांनी केले होते.

यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला देशातील जनतेने अभूतपूर्व असा प्रचंड प्रतिसाद दिला. यामुळे देशात देशभक्तीची लाट निर्माण झाली आहे.

पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, तिरंगा झेंडा आपल्या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. म्हणूनच देशात स्वाभिमान आणि अभिमानाची लाट आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे. या निमित्त मी कर्जत जामखेड मतदारसंघातील जनता, अहमदनगर जिल्ह्यातील जनता तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेस शुभेच्छा देतो असे शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांचे स्मरण म्हणून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. जामखेड तालुक्यात या उत्सवाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.
