Anil Ramod CBI Custody : शिवाजीनगर कोर्टाने अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना सुनावली सीबीआय कोठडी

पुणे  : महसुल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (Additional Divisional Commissioner Anil Ramod was caught red-handed by CBI while accepting bribe) यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची घटना शुक्रवारी घडली होती.त्यामुळे या प्रकरणात अनिल रामोड (CBI arrested IAS Anil Ramod) यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने अनिल रामोड यांना शनिवारी 10 जून 2023 रोजी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात (Shivajinagar Court Pune) हजर केले.यावेळी कोर्टाने अनिल रामोड यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. (Anil Ramod CBI Custody) डाॅ अनिल रामोड हे (dr Anil ramod ias) वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.

Additional Divisional Commissioner Anil Ramod remanded in CBI custody by Shivajinagar court pune, dr anil Ramod latest news today in marathi,

8 लाखांच्या लाचखोरीत अनिल रामोड यांची चौकशी सुरु असताना सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी शुक्रवारी अनिल रामोड (Anil Ramod CBI Raid in pune) यांच्या पुण्यातील कार्यालयासह निवासस्थानांवर टाकलेल्या धाडीत 6 कोटी 64 लाखांची रोकड आणि 14 स्थावर मालमत्तांचे कागदपत्र जप्त केले होते. त्यानंतर रामोड यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.

अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड यांना सीबीआयने पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात 10 जून 2023 रोजी हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली.सीबीआयने डॉ अनिल रामोड यांच्या कार्यालयात शुक्रवारी टाकलेल्या धाडीवेळी रामोड यांच्या कार्यालयातून दोन आयफोन जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एक नवा तर एक जूना आयफोन आहे. शुक्रवारी केलेल्या तपासात रामोड यांच्याकडून एकूण 6 कोटी 64 लाख जप्त केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले.

डॉ अनिल रामोड यांचं व्हाइस टेस्ट करण्याबरोबरच पुढील तपास करण्यासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितल. त्यामुळे न्यायालयाने अनिल रामोड यांना 13 जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

डॉ रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार एक महिन्यापूर्वी सीबीआयकडे आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी 9 जून 2023 रोजी दुपारच्या सुमारास अनिल रामोड यांच्या कार्यालयातच सीबीआयने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रामोड यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर रामोड यांच्या औंध बाणेर परिसरातील फ्लॅटवर देखील सीबीआयने छापेमारी केली आणि तब्बल या छाप्यात 6 कोटी 64 लाख रुपये जप्त केले.

महसुल विभागात लाचखोरीचा भस्मासुर घुसला असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. महसुल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जर लाखो रूपयांच्या लाच प्रकरणात अडकत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. पुण्यातून शुक्रवारी समोर आलेली घटना राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आहे. सीबीआय कोठडीत डाॅ अनिल रामोड यांच्याकडून आणखीन कोण कोणत्या गोष्टींचा खुलासा होतो याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.