जामखेड : शहर व परिसराला वादळी पावसाचा तडाखा, अनेक भागात झाडे अन् वीजेचे खांब उन्मळून पडले, महावितरणचे लाखोंचे नुकसान !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहर व परिसरात शनिवारी 10 जून 2023 रोजी दुपारी मान्सूनपूर्व वादळी पावसाने (Presence of pre-monsoon stormy rain in Jamkhed) हजेरी लावली.वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने जामखेड (Jamkhed) शहरातील करमाळा चौक परिसर, आरोळेवस्ती, खर्डा रोड, तपनेश्वर रोड भागात मोठे नुकसान केले. या भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली.ओरोळेवस्ती येथे महावितरणचा विजेचा खांब कोसळण्याची घटना घडली.यामुळे जामखेड शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

Jamkhed city and its surroundings were hit by stormy rain, trees and electricity poles were uprooted in many areas, loss of lakhs of rupees, Presence of pre-monsoon stormy rain in Jamkhed,

जामखेड शहर व परिसरात शनिवारी दुपारी 4 च्या  सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी पण वादळी वारे जास्त अशी स्थिती होते. वादळामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली.काही भागात झाडांच्या फांद्या महावितरणच्या तारांवर कोसळल्या, यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले.

या वादळामुळे करमाळा चौकातील लिंबाचे मोठे झाड पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीवर कोसळले. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जिवित हानीची घटना घडली नाही. आरोळेवस्ती येथील वीजेचा खांब या वादळामुळे भुईसपाट झाला. करमाळा रस्त्यावर विजेचा खांब आणि वीजवाहक तारा पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजवाहक तारा अन विजेचा खांब तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली.

पुढील तीन दिवस धोक्याचे

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे.वाढत्या तापमानात वादळी पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे अवाहन करण्यात आले आहे.