स्मिता पाटील यांच्या अभिनयाची आठवण ताजी करणाऱ्या अभिनेत्री अर्चना महादेव हिचे दोन चित्रपट महाराष्ट्राला वेड लावण्यासाठी सज्ज !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। चित्रपट म्हटलं की अभिनेत्री कोण हा सिनेरसिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, त्यातही मराठी चित्रपट म्हटलं की विशिष्ट चेहर्‍यांची मक्तेदारी आलीच, पण आपल्या कसदार अभियनाने चंदेरी दुनियेत नाव कमावणाऱ्या मोजक्या नव्या चेहर्‍यांचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा एक नाव समोर येतं, ते म्हणजे अर्चना महादेव या अभिनेत्रीचं.

Actress Archana Kharpude's two films are ready to make Maharashtra go crazy, simta patil, ghoda, masuta marathi movie Released on February 17 and 23

अर्चनाने आजवर साकारलेल्या दमदार भूमिका दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आठवणी ताज्या करणाऱ्या ठरल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात अर्चना महादेव हिच्या प्रमुख भूमिका असलेले ‘मसुटा’ आणि ‘घोडा’ हे दोन चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत. प्रदर्शनाआधीच दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषता: अर्चना महादेव हिच्या कसदार अभिनयाची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रात शिगेला पोहचली आहे.

अर्चना महादेव ही तरूण अभिनेत्री मुळची अहमदनगर जिल्ह्यातील जामगाव या पारनेर तालुक्यातील लहानश्या खेड्यातील रहिवासी आहे. तिचा आजवरचा प्रवास अतिशय संघर्षाचा राहिला आहे. पण लहानपणी टिव्हीत जाण्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने घेतलेली कठोर मेहनत अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अर्चना हिने आजवर अनेक लघुपटांत काम केले आहे. आपल्या कसदार अभिनयाने तिने महाराष्ट्रातील कला रसिकांचे अल्पावधीतच आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. आजवर तिने अनेक छोट्या मोठ्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अर्चनाची महाराष्ट्रात खरी चर्चा सुरू झाली ती एका चित्रपटातील मसणजेग्याच्या भूमिकेमुळे. सामाजिक विषयांवर तीने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेची सातत्याने चर्चा झाली आहे.

Actress Archana Kharpude's two films are ready to make Maharashtra go crazy, simta patil, ghoda, masuta marathi movie Released on February 17 and 23

एका गरीब आणि चित्रपट क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसलेल्या परिवारात जन्मलेल्या अर्चना महादेव या तरूण अभिनेत्रीचे येत्या पंधरा दिवसांत ‘मसुटा’ आणि ‘घोडा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान मसुटा हा चित्रपट ओटीटीवर कोरोना काळात प्रदर्शित झाला होता. यातील अर्चनाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती. आता चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मसुटा या चित्रपटाच्या माध्यमांतून मराठी चित्रपटसृष्टीला अर्चना खरपुडे ही कसदार अभिनय असलेली प्रतिभासंपन्न कलावंत मिळाली.

Actress Archana Kharpude's two films are ready to make Maharashtra go crazy, simta patil, ghoda, masuta marathi movie Released on February 17 and 23

अर्चनाने आतापर्यंत अनेक लघुपटांत नाटकांत काम केले आहे. त्यात ‘देव्हारा हा दानवाचा ‘ या नाटकातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले. मग पुढे ‘पैशाची कमाल बाईची धमाल’, ‘बोम्बले मामाच्या चाळीत चाललयं काय’, ‘एखाद्याचे नशिब, ‘उसनी बायको पाहिजे’, ‘गोष्ट लग्नानंतरची’ या नाटकांतून तिने प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. तर घात, उंबरा, निर्भया, पाटी, परतफेड, नॉट फॉर सेल, बलगार, जमिन, गोंधळ, नजुर, टिपरू, कबीर, छोटीशी जिंदगी, सोबत, प्रखर दो पल सोंगाड्या, कवडीमोल या लघुपटांत अर्चनाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर तिच्या जना या लघुपटाची चेन्नई, फ्रान्स, सिल्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिवलसाठी निवड झाली होती. काही दिवसापुर्वीच तिचा ‘कळाव’ हा चित्रपट येऊन गेला, तर अभिमानाची गोष्ट अशी की यावर्षी झालेल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात तिची मुख्य भुमिका असलेल्या ‘घोडा’ या चित्रपटाला बेस्ट ज्युरी अवार्डने गौरविण्यात आले.

Actress Archana Kharpude's two films are ready to make Maharashtra go crazy, simta patil, ghoda, masuta marathi movie Released on February 17 and 23

अर्चना हिची प्रमुख भूमिका असलेला घोडा हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारी 2023 ला तर मसुटा हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारी 2023 ला प्रदर्शित होत आहे. एकाच महिन्यात दोन दोन चित्रपट प्रदर्शित होणारी अर्चना ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. अर्चना हिचा अभिनय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण ताजी करणारा असल्याच्या प्रतिक्रिया रसिकांकडून सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. त्यामुळे घोडा आणि मसुटा या दोन्ही चित्रपटांमध्ये अर्चनाने साकारलेल्या भूमिका पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर झाला आहे.

दरम्यान, अभिनेत्री अर्चना महादेव हिने आजवर अनेक नाटकं, लघुपट, एकांकीका यात साकारलेल्या भूमिका जितक्या चर्चेत आल्या त्याहून तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे. येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या घोडा आणि मसुटा या चित्रपटांविषयी बोलताना अर्चना म्हणाली की, आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास  त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो. साहजिकच त्यासाठी निरीक्षण ही फार महत्वाच असतं. दोन्ही चित्रपटातील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्यामुळे खऱ्या जीवनात वाट्याला आलेला संघर्ष या भूमिका करताना खुप महत्वाचा ठरला. महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझ्या भूमिका नक्कीच आवडतील. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पहावेत, असे अवाहन यावेळी अर्चनाने केले आहे.