जामखेड: महाशिवरात्रीनिमित्त हळेश्वर देवस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख।महाशिवरात्रीनिमित्त जामखेड तालुक्यातील हळगाव येथील हळेश्वर देवस्थानच्या वतीने यंदा पहिल्यांदाच हळेश्वर देवस्थानच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर सांगता 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यंदा या सप्ताहाचे पहिले वर्ष आहे. सौताडा येथील पांडुदेवा यांच्या हस्ते या सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे.
हळेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हभप अंकुश महाराज रणखांबे, हभप कांचनताई सर्जेराव लकडे, हभप ज्ञानेश्वर महाराज काकडे, सचिन महाराज आनंदे, हभप गणेश महाराज भोरे, हभप सतिश महाराज शास्त्री, हभप कैलास महाराज खंडागळे या नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा लाभणार आहे. तर हभप नामदेव महाराज कापसे, हभप कांचनताई सर्जेराव लकडे,हभप प्राचीताई सरोदे, हभप ज्ञानेश्वरी महाराज जगताप, हभप विलास महाराज शिंदे, हभप बापु महाराज पाठक, हभप हनुमंत महाराज निकम यांचे प्रवचन होणार आहे.
सप्ताह काळात दररोज काकड आरती, शिवलिलामृत पारायण, गाथा भजन, महिला भजनी मंडळ भजन, हरिपाठ, संगीत भजन जागर असे कार्यक्रम होणार आहेत. सप्ताह काळात व्यासपीठ चालक म्हणून हभप नामदेव महाराज कापसे व मृदुंगाचार्य नाना महाराज हे असणार आहेत. सदर सप्ताहाची सांगता हभप दत्ता महाराज आंबिरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. त्यानंतर कांतीलाल बन्सी ढवळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हळेश्वर देवस्थानच्या वतीने यंदा पहिल्यांदाच हळेश्वर देवस्थानच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने हळेश्वर देवस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हळगाव आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे अवाहन हळेश्वर देवस्थानच्या वतीने केले आहे.