मिनीनाथ दंडवतेंसह राज्यातील 52 अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासन सेवेत (IAS) निवडीने नियुक्तीसाठी होणार शिफारस, सरकारने मागवले गोपनीय अहवाल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यातील 52 अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीसाठी शिफारस करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पत्र काढत अधिकाऱ्याची गोपनीय माहिती इंग्रजीत मागवली आहे. तसे आदेश 6 जूलै रोजीच्या पत्राद्वारे काढण्यात आले आहेत.

सन २०२२ मध्ये (निवडसूची- २०२१) बिगर राज्य नागरी सेवेतून (NON-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी पात्रता निकष (Bench Mark Criteria) सामान्य प्रशासन विभाग शासन पत्र क्र. एआयएस-१३१९/प्र.क्र.२६५/दहा. दि.०२.०९.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले आहेत.त्यानूसार भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीसाठी २ पदांकरीता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या विभागांतर्गत नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, विभागस्तर, जिल्हास्तर व इतर कार्यालये येथे कार्यरत असलेल्या संवर्ग मुख्याधिकारी, गट-अ (नि.श्रे.) व मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांचे  दि.०१.०१.२०२१ रोजी उपजिल्हाधिकारी या पदाशी समकक्ष घोषित पदावर किमान ८ वर्षे सेवा झालेले व ५६ वर्षापेक्षा जास्त वय नसलेले आणि संबंधितांकडून ७ वर्षाचे गोपनीय अहवाल अ+ (अत्युत्कृष्ट) उपलब्ध होऊ शकणारे विचारक्षेत्रातील मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकारी यांनी सन २०१३-१४ ते दि. २०२०-२१ या कालावधीतील गोपनीय अहवाल अभिलेख प्रादेशिक भाषेत म्हणजेच मराठीत असल्यामुळे, त्यांचा इंग्रजी अनुवाद करुन, मुळ प्रतीत तात्काळ संचालनालयास समक्ष (ई-मेल अथवा मोबाईल व्हॉट्सअप इ. माध्यमाद्वारे प्राप्त गो. अ. प्रती विचारात घेतले जाणार नाहीत) प्राप्त होतील, अशाप्रकारे सादर करावे असे म्हटले आहे.

ज्या संबंधित अधिकाऱ्यांचे सन २०१३-१४ ते दि.२०२०-२१ या कालावधीतील आवश्यक असलेले गोपनीय अहवाल संचालनालयास समक्ष मुळ प्रतीत प्राप्त होणार नाहीत. त्यांच्या नावाचा, शासनास सन २०२२ मध्ये (निवडसूची- २०२१) बिगर राज्य नागरी सेवेतून (NON-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी विचारक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पाठविताना विचार केला जाणार नाही असेही या पत्रात म्हटले आहे.

विचारक्षेत्रातील अधिकाऱ्यांची यादी

 1. श्री.देविदास दगडूबा टेकाळे
 2. श्री. गणेश निलकंठराव देशमुख
 3. श्री. देविदास गंगाधरराव पवार
 4. श्री.संजय सुधाकरराव निपाणे
 5. श्री. सुनिल मोहनराव पवार
 6. श्री. विजयकुमार एकनाथ खोराटे
 7. श्री. प्रदीप गणपतराव जगताप
 8. श्रीमती तृप्ती उमेश सांडभोर
 9. श्री. नितिन गुलाबराव कापडनीस
 10. श्रीमती अश्विनी कृष्णदेव वाघमळे
 11. श्री. मिलिंद भालचंद्र सावंत
 12. श्री. राजेश मोहनराव मोहिते
 13. श्री. विजय पांडूरंग म्हसाळ
 14. श्री. रविंद्र शेषराव जाधव
 15. श्री. अजिज करीम शेख
 16. श्री.त्र्यंबक दामोदर कासार
 17. श्री. भालचंद्र शालीग्राम बेहेरे
 18. श्री. दत्तात्रय गणपतराव लांघी
 19. श्री.संभाजी पांडूरंग वाघमारे
 20. श्रीमती स्मिता गंगाराम झगडे
 21. श्री.बाबासाहेब पुडंलिकराव मनोहरे
 22. श्री. संतोष महादेव खांडेकर
 23. श्रीमती विद्या उमेशराव गायकवाड
 24. श्री. सुमंत गणपतराव मोरे
 25. श्री. प्रदीप विनायकराव पाठारे
 26. श्री. अभिजित सतीश बापट
 27. श्री. प्रशांत दत्तात्रय रसाळ
 28. श्री. भालचंद्र वसंत गोसावी
 29. श्री. सुनिल लक्ष्मण लहाने
 30. श्री. राजेंद्र बापूसो फाले
 31. श्री. ओमप्रकाश राजारामजी दिवटे
 32. श्री. अजय राजाराम चारठणकर
 33. श्री. महेश उत्तमराव डोईफोडे
 34. श्री. राजेश दशरथ कानडे
 35. श्री. चंद्रकांत शिवाजी खोसे
 36. श्री. सुधाकर तुकाराम जगताप
 37. श्री. दिपक दिगंबर पुजारी
 38. श्री. अनिल रामचंद्र जगताप
 39. श्री.ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे
 40. श्री. उत्कर्ष सोपानराव गुटे
 41. श्री. मिनिनाथ विलास दंडवते
 42. श्री. समीर बबनराव उन्हाळे
 43. श्री. संजय नारायणराव काकडे
 44. श्री. बालाजी नामदेवराव खतगांवकर
 45. श्री. प्रशांत शरद खांडकेकर
 46. श्री. प्रविण श्रीराम अष्टीकर
 47. श्री. संतोष पंढरीनाथ देहेरकर
 48. श्री. सुधाकर विष्णू देशमुख
 49. श्री. संजय हिराप्पा हेरवाडे
 50. श्री. शंकर बबन गोरे
 51. श्री. नितिन नानासाहेब देसाई
 52. श्री. अनिल हरीहर मुळे