Nashik Revenue Department | तहसीलदार नानासाहेब आगळे ठरले एम्प्लॉयी ऑफ द मंथचे मानकरी; नाशिक महसुल विभागात कर्जतची कामगिरी दमदार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Nashik Revenue Department | कर्जतचे कर्तव्यदक्ष तहसीलदार नानासाहेब आगळे “एम्प्लॉयी ऑफ द मंथ”चे (Employees of the Month) पाहिले मानकरी ठरले आहेत.

तहसीलदार नानासाहेब आगळे (Tehsildar Nanasaheb Aagale) यांच्या निवडीचे पत्र सोमवारी कर्जत महसुल प्रशासनास प्राप्त झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले (Sub Divisional Officer Dr Ajit Thorbole) यांनी दिली.

महसुल प्रशासन कार्य आणि कामकाजाची पद्धत अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक व्हावे. यासह वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयात नमूद निष्कर्ष आणि उद्दिष्टांप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी पार पाडत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना नाशिक महसुल विभागाकडून “एम्प्लॉयी ऑफ द मंथ” या पुरस्काराने सन्मानीत करण्याचा एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर कर्जतचे कर्तव्यदक्ष तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी माहे ऑक्टोबर २०२१ मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधात्मक कारवाई, अन्न सुरक्षा योजनेत कर्जत तालुक्यास दिलेल्या इष्टांकाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांची निवड करून नवीन १३०० रेशनधारकांना अन्नधान्य सुरू करणे, कर्जत तालुक्यात दरमहा चौथ्या शुक्रवारी फेरफार अदालतीचे आयोजन करणे, कर्जत तालुक्यातील पोट खराबा अहवाल जिल्हाधिकारी कार्यलय अहमदनगर येथे विहित मुदतीत सादर करणे.

Nashik Revenue Department Employees of the Month Tehsildar Nanasaheb Aagale

कर्जत तालुक्याची फेरफार प्रलंबितता ९०% कमी करून ८४१ फेरफार निर्गत करणे तसेच कर्जत तालुक्यातील पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणणे संदर्भात उल्लेखनीय कार्य पार पाडल्याबद्दल त्यांना तहसीलदार संवर्गातून “एम्प्लॉयी ऑफ द मंथ” चा प्रथम तहसीलदार होण्याचा मान प्राप्त झाला आहे.

तहसीलदार आगळे यांच्या निवडीचे आमदार रोहित पवार, कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, महसुल नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्यासह सर्व महसुल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यावेळी तहसीलदार आगळे यांचा कर्जत महसुल प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.