Big Decision Of The Election Commission | राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : big decision of the Election Commission | सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC ReservestionOrdinance) अध्यादेशाला स्थगिती दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections)  निवडणुकीत ओबीसींच्या 27 टक्के राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश रद्द ठरवण्यात आल्यानंतर राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी मोठा निर्णय घेत राज्यातील 106 नगरपंचायतीत सुरू असलेली निवडणुक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ओबीसींसाठी राखीव असलेल्या 344 जागांवर निवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील 106 नगरपंचायतीत एकुण 01 हजार 802 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 344 जागांवर ओबीसींचे आरक्षण आहे.ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचानंतर निवडणूक आयोगाने ओबीसींच्या 344 जागेसाठी होणाऱ्या निवडणूका स्थगित केल्या आहेत.मात्र इतर प्रवर्गासाठी होणारी निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत.