जामखेडच्या संघर्ष मित्र मंडळाने उचलले पुरोगामी पाऊल, महिलांच्या हस्ते गणरायाची आरती करून दिला नवा संदेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। सार्वजनिक उत्सवात पुरूष कायम पुढे असतात. महिलांना सहसा सामावून घेतले जात नाही.पुरूषी उत्सवात महिलांनाही सामावून घेतले पाहिजे. हाच विचार कृतीतून जामखेडमध्ये पुढे आणला गेला आहे. 1982 साली स्थापन झालेल्या जामखेडच्या संघर्ष मित्र मंडळाने गणरायाच्या आरतीचा मान महिलांना देऊन पुरोगामी पाऊल उचलले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जामखेड शहरातील कोर्ट रोडवरील संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 40 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी मंडळाच्या वतीने महाप्रसाद, महिलासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंडळाने या वर्षी महिलांना गणरायाच्या आरतीचा मान देत नवा पायंडा पाडला.
यावेळी मीरा तंटक,अमृता लोहकरे,शोभा निमोणकर,आरती राळेभात, रोहिणी दळवी,कीर्ती चिंतामणी,शुकांता डोंगरे, मनीषा काटकर,सुशा डोंगरे,शोभा चिंतामणी निर्मला शिंदे, उषा ढोले, अंजली लोहकरे,मोहनी ओझर्डे,ज्योती लोहकरे, सीमा लोळगे,विद्या कस्तुरे,नलिनी कासार,वैशाली डोंगरे, सुवर्णा डोंगरे,सोनाली काथवटे,माधुरी काथवटे,सुनीता अंदुरे, अंकिता लोहकरे,ज्योती ढोले,,वंदना डोंगरे,सोनाली लोहकरे, कविता जगदाळे,आरती आष्टेकर,श्रेया भंडारी,मालन शिंदे, ज्योती तंटक,ललिता शेटे,स्वाती शेटे,नंदा तंटक,केशर राळेभात, राणी औचरे,भरती भांगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.