पांढरा शुभ्र पोशाख.. डोक्यावर फेटे अन डिजेच्या तालावर मनमुराद डान्स, जामखेड पोलिस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने वेधले जामखेडकरांचे लक्ष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। वार गुरूवार.. वेळ दुपारची… शहराच्या वेगवेगळ्या भागातील गणेश मंडळांच्या मंडपातून भक्तीगीतांचा स्वर कानी… संपुर्ण शहर गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात न्हाऊन निघालेलं.. काही मंडळांचे कार्यकर्ते गणेश विसर्जनाच्या तयारीत गुंतलेले.. तर दुसरीकडे पोलिस बांधवांची पोलिस स्टेशनच्या आवारात जमवा जमव सुरू… पण आज दिसणारे दृश्य जरा चकीत करणारं होते.. कारण ऐरवी खाकी वर्दीत दिसणारे पोलिस बांधव पांढर्‍या शुभ्र पोशाखात.. डोक्यावर तुर्रेबाज फेटा बांधून पोलिस स्टेशनच्या आवारात जमले होते.. निमित्त होतं पोलिस स्टेशनच्या गणरायाच्या निरोपाचं !

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

एरवी कुठलाही सण असो अथवा समारंभ तो पोलिसांना सहजपणे साजरा करता येत नाही. 365 दिवस ऑन ड्यूटीवर असलेले पोलिस बांधव गुरूवारी मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसत होते. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जामखेड पोलिस स्टेशनची टीम सज्ज झाली होती. दुपारी जामखेड पोलिस स्टेशनची गणेश विसर्जन मिरवणूक शहरातून निघाली होती. जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने बसवण्यात आलेल्या गणरायाचे आज मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

यावेळी पोलिस स्टेशनची गाडी फुलांनी सजवण्यात आली होती. त्यात गणराय विराजमान झाले होते. वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक पोलिस स्टेशनपासून निघाली. मिरवणूक जयहिंद चौकात येताच शिस्तबद्ध मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस बांधव मनमुरादपणे मिरवणुकीत नाचताना दिसत होते. काही पोलिस बांधव पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड खांद्यावर घेऊन नाचत होते.

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे सुध्दा आज वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसत होते. गायकवाड यांनीही आपल्या सहकाऱ्यांसमवेत मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. महिला पोलिस कर्मचारी सुध्दा मिरवणुकीत मनसोक्त नाचताना दिसल्या. मिरवणुकीत नागरिकसुध्दा पोलिस बांधवांसमवेत नाचताना दिसले. एकुणच जामखेड पोलिस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने शिस्तबद्ध मिरवणूक काढत शहरवासियांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.या मिरवणूकीची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या लुकने या मिरवणुकीत चार चाँद लावले होते. पांढराशुभ्र पोशाख, डोक्यावर तुर्रेबाज फेटा.. डोळ्यावर काळा गाॅगल आणि संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचणारे गायकवाड साहेब हे दृश्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. अनेक जण हा क्षण कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी सरसावले होते. मागील दोन अडीच वर्षांत गायकवाड साहेबांनी जनमानसांत निर्माण केलेली चांगली प्रतिमा आज आणखीनच उजळून निघाली.

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

शिस्तबद्ध मिरवणूकीमुळे गुरूवारचा संपुर्ण दिवस गाजवला तो पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि त्यांच्या टीमने ! पोलिस बांधवांच्या गणेश विसर्जन मिरवणूकीची सांगता अतिशय थाटामाटात पार पडली. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,

यावेळी या मिरवणुकीत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, अनिल भारती, महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी भोस, परमेश्वर गायकवाड, महादेव गाडे, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, संजय लाटे, भगवान पालवे, पोलिस नाईक अविनाश ढेरे, अजय साठे, संग्राम जाधव, राहुल हिंगसे, बाळासाहेब तागड, भागवत, पोलिस काँस्टेबल अरूण पवार, आबासाहेब आवारे, संदिप आजबे, दत्तु बेलेकर,विजय कोळी, सचिन पिरगळ, श्रीकांत शिंदे, ईश्वर परदेशी, सचिन सगर, सचिन राठोड, संदीप राऊत, सतिश दळवी, प्रकाश जाधव, अजिनाथ जाधव, दिनेश गंगे, ज्ञानेश्वर बेलेकर, महिला पोलिस काँस्टेबल मनिषा दहिरे, सपना शिंदे सह होमगार्ड या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Jamkhed Police's Manmurad Dance to DJ's Beats, Ganesh Immersion Procession of Jamkhed Police Station Attracted the Attention of Jamkhedkars, Ganesh visarjan 2022, ganeshotsav 2022,