वस्ताद सत्ता ग्रुपच्या खेळ पैठणी कार्यक्रमाने मोडले  सर्व रेकॉर्ड, रेश्मा काळे ठरल्या विजेत्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेडचे माजी सरपंच कैलास माने आणि वस्ताद सत्ता ग्रुपने गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांची जामखेडमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या काळी मैना आणि खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. माजी सरपंच कैलास माने यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Vastad Satta Group's Khel Paithani Program Breaks All Records, Reshma Kale Becomes Winner

जामखेडचे माजी सरपंच कैलास माने आणि वस्ताद सत्ता ग्रुपने गणेशोत्सवानिमित्त काॅमेडी तडका खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनेते सुभाष यादव यांच्या टीमने जामखेडकरांनी मने जिंकली. खेळ पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी रेशमा काळे या ठरल्या तर तर द्वितीय जाधव तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी वर्षा पवार या ठरल्या आहेत.

जामखेडचे माजी सरपंच कैलास माने सर आणि  वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी करीना काळे (काळी मैना) यांचा म्हाळसाकांत डिजिटल आॅर्किट्रा कार्यक्रम संपन्न झाला होता. या कार्यक्रमासाठी तरूण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. करीना काळे हिने आपल्या कलेने जामखेड करांची मने जिंकली होती. या कार्यक्रमात अनेकांनी तिच्या गाण्यावर ठेका धरला होता.

या नंतर प्रसिध्द अभिनेते सुभाष यादव यांच्या काॅमेडी तडका खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अभिनेते सुभाष यादव यांनी बच्चे कंपनीला स्टेजवर बोलावून विविध प्रश्न विचारत विनोदी सूत्रसंचालन करून उपस्थितांना मनमुराद हसवले.

या कार्यक्रमात अभिनेते सुभाष यादव प्रस्तुत खेळ पैठणीचा तुफान काॅमेडी कार्यक्रमात पैठणीचे मानकरी रेशमा काळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय जाधव तर तृतीय क्रमांक वर्षा पवार यांनी पटकावले, यावेळी सारिका माने, कल्पना येवले, काजल जाधव, दिपाली माने, वर्षा माने, आशा शिंदे, अंकिता थोरात, उषा शेळके, कल्पना येवले सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

वस्ताद सत्ता ग्रुपचे उल्हास माने (वस्ताद), माजी सरपंच कैलास माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिकेत (पप्पू) जाधव, अक्षय शिंदे, शरद माने, श्रीकृष्ण शिरोळे, अभिजीत माने, तुषार माने, बबलू जाधव, राहुल माने, महेश येवले, योगेश पवार, आनंद भोज, विशाल काशिद, भरत जायगुडे, राहुल शिरगिरे, ज्ञानेश्वर जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

मंगळवारी दि ६ रोजी तपनेश्वर गल्ली येथील वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे हसुन हसुन पोट दूखवणारा भन्नाट व सुपरहिट काॅमेडी तडाखा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याकार्यक्रमाने महिला, मुले व युवकांना खळखळून हसवले. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

वस्ताद सत्ता ग्रुप गणेशोत्सव आयोजित करीना काळे काळी मैना हिच्या बहारदार कार्यक्रमानंतर आता तुफान काॅमेडी अभिनेता सुभाष यादव यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा काॅमेडी तडाखा कार्यक्रमाने चांगले मनोरंजन झाले. प्रेक्षकांना टेन्शन फ्री केले. या कार्यक्रमाची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.