जामखेड : कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रीतम कस्तुरे, मंजुषा तवटे यांच्यासह स्कुलचे संचालक नितीन तवटे, प्रशांत कानडे, निलेश तवटे, सागर अंदुरे , मुख्याध्यापक प्रशांत जोशी, शिक्षक पालक समितीचे सर्व सभासद आणि पालकवर्ग यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या ध्वजारोहण करण्यात आले.

Jamkhed Kalika Podar Learn School celebrated Republic Day with enthusiasm

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या गायन गटांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केली. तसेच यावेळी गायन, नृत्य, कराटे, योगा आणि मुकनाट्याचे कार्यक्रम पार पडले.

Jamkhed Kalika Podar Learn School celebrated Republic Day with enthusiasm

विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मातृभूमीबद्दलची तळमळ आणि देशप्रेमाने रंगमंचावर देशाभिमान जिवंत केले. इयत्ता सातवीचा विद्यार्थी अभिनव काकडे याने इंग्रजीतून भाषण केले, इयत्ता आठवीची विद्यार्थ्यांनी पल्लवी जायभाये हिने मराठीतून भाषण केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी श्रुती काळे हिचे हिंदीतील प्रेरणादायी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी समृद्धी चव्हान आणि नववीचा विद्यार्थी रयान मकरानी यांनी केले.आभार प्रदर्शन इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी श्रेया सगळे हिने केले.