- Advertisement -

मोकाट जनावरे पकडण्यासाठी जामखेड नगरपरिषद सरसावली (Jamkhed Municipal Council rushed to catch animals)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी शहरवासियांनी सातत्याने मागणी होत होती. (Jamkhed Municipal Council rushed to catch Mokat animals) मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड काॅर्नर, बीड रोड, बसस्थानक परिसर, एवन काॅर्नर, धाकली नदी पुल तसेच मेन पेठ या भागात सातत्याने मोकाट जनावरांमुळे वाहतुक कोंडी होत असायची. आता नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारपासुन कारवाईस प्रारंभ केला आहे.

Jamkhed Municipal Council

मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगरपरिषद मार्फत सोमवारपासुन सुरू करण्यात आली आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या पथकाने एकुण 09 मोकाट जनावरे पकडले आहेत. पकडलेल्या जनावराला दंड आकारून मूळ मालकाकडे देण्यात येणार आहेत जनावरे मोकाट सोडणाऱ्या लोकांना याद्वारे सुचना करण्यात येते की नगरपरिषद मार्फत नियमित कारवाई करण्यात येणार असून दोन दिवसांत जनावरे ओळख पटवून सोडवून नेली नाहीत तर त्यांच्या जनावरांचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. Jamkhed Municipal Council rushed to catch Mokat animals