- Advertisement -

सरदवाडीत ओढा खोलीकरणाच्या कामास प्रारंभ (Start of deepening work in Saradwadi)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील विविध भागात सध्या नदी व ओढे खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहेत. सोमवारी जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. (Start of deepening work in Saradwadi)

Start of deepening work in Saradwadi

यावेळी रमेश आजबे  सरपंच शहाजी गाडे , ज्योतीराम बांदल,  चंद्रकांत नाना आजबे , ग्रामपंचायत सदस्य रामदास शिरसाठ, राम जरांडे व  पप्पू गंभीरे ,संपत गंभीरे सचिव भानुदास गंभीरे,पैलवान कृष्णा गाडे,अंकुश गाडे,दादा गाडे,नितीन शिंदे व ईश्वर गंभीरे रामदास चव्हाण,अशोक चव्हाण,उद्धव शिरसाठ समन्वयक अकाश घोडके सह आदी उपस्थित होते.जामखेड तालुक्यात नदी व ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी याचा तालुक्याला मोठा फायदा होऊ शकतो असे आता बोलले जात आहे.(Start of deepening work in Saradwadi)