जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधातली राजकीय विरोधाची तलवार झाली म्यान; जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून सुरेश भोसलेंची माघार ! (Ahmednagar District Bank elections 2021)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : सध्या अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे.राष्ट्रवादीचे नेते सुरेश भोसले (suresh Bhosale) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जगन्नाथ तात्या राळेभात (Jagnnath Ralebhat) यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध झाली आहे. राळेभात यांची बिनविरोध निवड होताच राळेभात समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. (The sword of political opposition against Jagannath Ralebhat became a sword; Suresh Bhosale withdraws from Ahmednagar District Bank elections2021)

दरम्यान सेवा सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ तात्या राळेभात यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrushn vikhe patil) व खासदार सुजय विखे पाटील (Sujay vikhe patil) व आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी केलेली शिष्टाई फळास आली. अन राष्ट्रवादीचे नेते सुरेश भोसलेंनी जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधात उपसलेलली राजकीय विरोधाची तलवार म्यान करत निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांची जिल्हा बँकेवर सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे.

Ahmednagar District Bank elections 2021

सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रीय आहे. विखे गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. विविध कार्यकारी सेवा संस्था या मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येत आहे. जामखेड तालुक्यातील सेवा संस्थांवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. यंदा होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारी घेण्यास सध्या सुरूवात झाली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी विखे गटाने ताकद लावली आहे. तर थोरात गटही अनेक खेळ्या करण्यास सरसावल्याने बँकेच्या निवडणूकीत मोठी रंगत आली आहे. (Ahmednagar District Bank elections 2021)