जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या निवडणुकीत डॉ संजय राऊत यांनी मारली बाजी 

जामखेड टाइम्स वृत्तसेवा – जामखेड तालुका डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाॅ संजय राऊत यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील ते रहिवासी आहेत.जामखेड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ते खाजगी रूग्णालयाच्या माध्यमांतून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dr. Sanjay Raut won the election of Jamkhed Taluka Doctors Association

जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. अतिशय खेळीमेळीच्या पण चुरशीच्या वातावरणात ही निवडणूक झाली.या निवडणुकीत डॉ बाबासाहेब कुमटकर यांनी डॉ संजय राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला. डॉ संजय राऊत यांनी या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवत बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डाॅ अनिल गायकवाड यांनी काम पाहिले.

विजयानंतर बोलताना डाॅ संजय राऊत म्हणाले की, डॉक्टर- रुग्ण  सुसंवाद राखणे, डॉक्टरांवरील होणारे हल्ले रोखणे, संघटनेचे रजिस्ट्रेशन करणे, संघटनेच्या कार्यालयासाठी जागा घेणे व डॉक्टर भवन बांधणे,संघटनेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवणे, महिला सदस्यांसाठी विविध उपक्रम राबवणे, प्रबोधन व कार्यशाळा आयोजित करणे, वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे अश्या प्रकारचे उपक्रम अगामी काळात हाती घेणार असल्याचा विश्वास डाॅ राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, डाॅ संजय राऊत यांची जामखेड तालुका डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल IMA चे अध्यक्ष डॉ गणेश झगडे, डॉ आनंद लोंढे, डॉ महेश घोडके, डॉ चंद्रकांत मोरे, डॉ सचिन काकडे, डाॅ सुरेश काशीद, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे,डॉ शशांक शिंदे, डॉ प्रशांत गायकवाड, डॉ दिनेश रसाळ, डॉ राजेंद्र पवार, डॉ अविनाश पवार, डॉ सागर शिंदे, डॉ प्रवीण मिसाळ, डॉ फारुख आझम, डॉ सर्फराज खान, डॉ तानाजी राळेभात, डॉ महादेव पवार, डाॅ दीपक वाळुंजकर, डॉ सुधीर ढगे, डॉ प्रकाश खैरना,  डॉ प्रताप गायकवाड, डॉ सुनील  कटारिया, डॉ संजय भोरे, डॉ सुरेश काशीद, यांनी अभिनंदन केले आहे.

जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनला डाॅ संजय राऊत यांच्या रूपाने चांगला अध्यक्ष लाभल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.