Breaking News : दोन चिमुकल्यांचे विहिरीत आढळले मृतदेह, निर्दयी बापानेचे घेतला पोटच्या लेकरांचा बळी ?,आळसुंदे गावातील खळबळजनक घटनेने कर्जत तालुका हादरला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रविवारी कर्जत तालुका एका धक्कादायक घटनेने हादरून गेला आहे. कर्जत तालुक्यातील आळसुंदे – निंबे रोड वरील एका विहिरीत दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्दयी बापानेच पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेने कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

निर्दयी बापाने रागाच्या भरात आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा जीव घेतल्याची घटना कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथून समोर आली आहे. या धक्कादायक घटनेत ऋतुजा गोकुळ क्षीरसागर वय ८, वेदांत गोकुळ क्षीरसागर ४ वर्ष या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह आळसुंदे येथील निंबे रोडवरील एका विहिरीत आढळून आले. दोन्ही मुलांचा जीव घेणाऱ्या गोकुळ क्षीरसागर यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो वाचला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

आळसुंदे गावचे पोलीस पाटील विजयकुमार अनारसे यांनी कर्जत पोलिस स्टेशनला सदर घटनेची खबर दिली. कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे निंबे रोड लगतच्या गोकुळ शिरसागर यांच्या विहिरीत मुलीची सॅंडल दिसत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पाटील यांच्यासह गावातील काही मंडळींनी जाऊन विहिरीच्या पाण्यात काट्या टाकून काट्या वर ओढल्या असता काट्याला गुतून मुलगी ऋतुजा गोकुळ शिरसागर वय आठ वर्ष व मुलगा वेदांत गोकुळ शिरसागर व चार वर्षे अशा दोन लहान चिमुकल्यांचे मृतदेह वर आले.

Shocking breaking news, Dead bodies of two children were found in  well, heartless father took victim of stomach children? Karjat taluka was shaken by sensational incident in Alsunde village

सदर मृतदेह अंबुलन्सने उपजिल्हा रुग्णालय कर्जत या ठिकाणी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस पाटील विजयकुमार अनारसे यांच्या खबरीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत.

दरम्यान, आळसुंदे गावातील एका विहिरीत दोन निष्पाप लहान मुलांच्या मृत्यूची घटना उघडकीस येताच कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर मुलांच्या मृत्यूस त्यांचा बापच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. निर्दयी बापामुळे निष्पाप मुलांचा नाहक बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.