ACB Trap News Today : मुरूम उत्खनन प्रकरणात 15 लाखांची लाच स्विकारताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात, महसूल विभागात उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ACB Trap News Today: मुरूम उत्खननाच्या प्रकरणात 15 लाख रूपयांची लाच स्विकारताना तहसीलदारांना रंगेहाथ पकडण्याची कारवाई नाशिकच्या एसीबी पथकाने केली. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नरेशकुमार तुकाराम बहिरम (Tehsildar Naresh Kumar Tukaram Bahiram) असे कारवाई करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर असे, राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील एका जमिनीच्या मालकाच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनन झाले होते. त्यावरून प्रशासनाने कारवाई करत मुरूम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केली होती. तसा आदेश नाशिक तहसीलदार यांच्या कार्यालयाने जारी केला होता.त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.

सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.

Tehsildar Naresh Kumar Tukaram Bahiram in net of ACB while accepting bribe of 15 lakhs in Murum Excavation case, there was stir in the revenue department, ACB Trap News Today,

परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याने ते तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटले. त्यावेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी सदर प्रकरणात 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.

सदरील लाच मागणीची एसीबीने पडताळणी केली असता तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी लाच स्वीकारण्याचे मान्य केले होती. नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 5 ऑगस्ट 2023 रोजी लावलेल्या सापळ्यात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना 15 लाखाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्रच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक (वाचक) नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे यांच्या टीमने पार पाडली. या पथकात पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पो. ना. गणेश निबाळकर,पो. ना. प्रकाश महाजन,पो. शि. नितीन नेटारे यांचा समावेश होता.

यशस्वी सापळा कारवाई

तक्रारदार – पुरुष,  ५२ वर्ष.
रा.  नाशिक
आलोसे – नरेशकुमार तुकाराम बहिरम, वय – ४४ वर्ष, धंदा – तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक

लाचेची मागणी-१५,००,००० /-  रुपये ( पंधरा लाख  रुपये )
लाच स्वीकारली – १५,००,००० /-  रुपये ( पंधरा लाख  रुपये ) 

लाचेचे कारण

राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

आलोसे यांचे सक्षम  प्राधिकारी – अप्पर मुख्य सचिव, महसूल, महाराष्ट्र राज्य.

सापळा अधिकारी : संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,

सह सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

सापळा पथक : पो.ना.गणेश निबांळकर,पो. ना. प्रकाश महाजन,पो. शि. नितीन नेटारे.

मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मा. श्री. माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.
नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी  अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.