जामखेड नगरपरिषदेतर्फे फुलांनी सजवलेल्या वाहनांमधून घरगुती गणेशाचे संकलन, जामखेड शहरात शांततेत गणेेश विसर्जन सुरु, नागरिकांचे आभार – मिनीनाथ दंडवते

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 2022 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या उत्साहात यंदा गणरायाचे आगमन झाले होते.आज बाप्पाला निरोप देण्यात आला.घरगुती गणेश विसर्जनासाठी जामखेड नगरपरिषदेकडुन घरोघरी जाऊन गणेशमुर्त्यांचे संकलन करण्यात आले होते. त्याचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले, शहरात शांततेत विसर्जन सुरु आहे, अशी माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

Collection of homemade Ganesha by Jamkhed Municipal Council from vehicles decorated with flowers, peaceful Ganesha immersion started in Jamkhed city, thanks to the citizens - Mininath Dandavate

जामखेड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोना महामारीनंतर यंदा साजरा होणारा गणेशोत्सव गणेशभक्तांसाठी खास ठरला. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. शांततामय वातावरणात यंदाचा गणेशोत्सव साजरा झाला. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली होती.

Collection of homemade Ganesha by Jamkhed Municipal Council from vehicles decorated with flowers, peaceful Ganesha immersion started in Jamkhed city, thanks to the citizens - Mininath Dandavate

गणेश विसर्जनासाठी जामखेड नगरपरिषदेमार्फत कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. गणरायाच्या आगमनापासून सात दिवसानंतर ते दहाव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या दिवशी शहरात गणेेशविसर्जन सुरू झाले होते. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

9 सप्टेंबर रोजी जामखेड नगरपरिषदेची टीम घरोघर जाऊन घरगुती गणेश मूर्ती संकलित करताना दिसली. घरगुती गणेश मुर्ती संकलनासाठी सजवलेली चार वाहने नगरपरिषदेकडुन प्रत्येक प्रभागात नेण्यात आली. संकलीत झालेल्या गणेश मुर्त्यांचे विधीपूर्वक नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.जामखेड नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग, प्रशासन विभाग,बांधकाम विभाग यांनी चोख नियोजन केले होते.

Collection of homemade Ganesha by Jamkhed Municipal Council from vehicles decorated with flowers, peaceful Ganesha immersion started in Jamkhed city, thanks to the citizens - Mininath Dandavate

जामखेड नगरपरिषद बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी मिरवणुकीच्या मार्गावर मुरूम टाकून खड्डे बुजवून घेण्यात आले. तसेच विद्युत विभागाने पथदिव्यांची सोय केली. यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरात गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडताना दिसत आहे. तब्बल 900 लहान मोठ्या गणेश मुर्तींचे विसर्जन पार पडले, अशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

जामखेड शहरातील सर्व नागरिकांचे आभार – दंडवते

यावर्षी पार पडलेल्या गणेशोत्सवात जामखेड शहरातील सर्व मंडळांनी तसेच नागरिकांनी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. सर्व मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूक काढली. मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन होत आहे. नागरिकांनी शांततामय वातावरणात यंदा गणेशोत्सव साजरा केला. शहरातील प्रत्येक उत्सव असाच उत्साहवर्धक वातावरणात प्रत्येकाने साजरा करावा. गणेशोत्सव शांततेत साजरा करणाऱ्या जामखेड शहरातील सर्व नागरिकांचे तसेच उत्सव काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त करणाऱ्या जामखेड पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि पोलिस बांधवांचे मनापासून आभार – मिनीनाथ दंडवते, मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद