जामखेड : जांबवाडी येथील युुवक बेपत्ता, कुटुंबीयांनी घेेतली पोलिसांत धाव, तरुणाचे अपहरण झाल्याचा संशय !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथील एक युवक दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता तरूणाच्या शोधासाठी कुटुंबाने जामखेड पोलिसात धाव घेतली आहे. बेपत्ता तरुणाचे अपहरण झाले असावे असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता तरूणाचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Jamkhed,Santosh Sagade from Jambwadi is missing, the family ran to the police, suspicion of abducting youth

जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे 8 सप्टेंबर 2022 रोजी संतोष नामदेव सागडे हा 34 वर्षीय युवक गावातील किराणा दुकानासमोर बसला होता, त्याचवेळी त्याच्याजवळ एक अज्ञात युवक मोटारसायकल घेऊन आला होता. त्या अज्ञात युवकाच्या गाडीवर बसुन संतोष हा बेपत्ता झाला आहे. अशी तक्रार कुटुंबियांनी दाखल केली आहे.

बेपत्ता संतोष सागडे या युवकाच्या अंगावर भगव्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पँट असा पोशाख आहे. त्याच्याजवळील मोबाईल फोन व इतर वस्तू घरीच आहेत. संतोषचा सर्वत्र शोध घेऊनही संतोष सापडला नाही. त्यामुळे नवनाथ सागडे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल केली आहे.

बेपत्ता युवक संतोष हा शेतकरी कुटुंबातील युवक आहे. तो शेती करायचा, संतोष स्वता:हून बेपत्ता झाला की त्याचे अपहरण करण्यात आले ? तो का गायब झाला ? नेमके कारण काय? याचा शोध जामखेड पोलीस वेगाने घेत आहेत. संतोषच्या अचानक बेपत्ता होण्याने कुटुंबात घबराटीचे वातावरण आहे.