बिग ब्रेकिंग : अखेर मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली, भाजपच्या मागणीला आले यश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अखेर जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली झाली आहे. याबाबते आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

Big breaking, finally transfer jamkhed Nagar Parishad mukhyadhikari Mininath Dandavate

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली व्हावी यासाठी, जामखेड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागाने आज जारी केले आहेत.

मिनीनाथ दंडवते यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची बदली झाली आहे. ते 26 डिसेंबर 2022 रोजी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील असे आदेशात म्हटले आहे.

Big breaking, finally transfer jamkhed Nagar Parishad mukhyadhikari Mininath Dandavate