मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली, जामखेडमध्ये भाजपने केली फटाक्यांसह तोफांची आतिषबाजी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीच्या आदेशाची बातमी जामखेडमध्ये 23 रोजी सायंकाळी धडकताच, जामखेड शहर भाजपने जामखेड शहरातील पुढारी वडासमोर फटाक्यांची आणि तोफांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

As soon as order came to transfer mukhyashikari Mininath Dandavate, BJP set off firecrackers in Jamkhed

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली व्हावी यासाठी, जामखेड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेत दंडवते यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला होता. त्यानंतर जामखेड शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या कारभाराची चौकशी करून तडकाफडकी बदली करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

अखेर आमदार राम शिंदे आणि जामखेड शहर भाजपने केलेल्या मागणीला आज 23 डिसेंबर 2022 रोजी यश आले. नगरविकास विभागाकडून मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. जामखेड शहरात ही बातमी धडकताच भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आणि तोफांची आतिषबाजी करत मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीचा आनंदोत्सव साजरा केला.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘आमदार राम शिंदे साहेब जिंदाबाद’ अश्या जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

As soon as order came to transfer mukhyashikari Mininath Dandavate, BJP set off firecrackers in Jamkhed

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, गणेश आजबे, अनिल यादव, डाॅ अल्ताफ शेख, तात्याराम पोकळे, प्रविण चोरडिया, शिवकुमार डोंगरे, ऋषीकेश मोरे, तुषार बोथरा, नाना राळेभात, बाळासाहेब गायकवाड, प्रविण होळकर, सुरज निमोणकर सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

As soon as order came to transfer mukhyashikari Mininath Dandavate, BJP set off firecrackers in Jamkhed

म्हणून भाजपने केली फटाक्यांची आतिषबाजीबिभीषण धनवडे

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या माध्यमांतून जामखेड नगरपरिषदेत अतिशय भोंगळ कारभार सुरु होता. दंडवते यांचा जुलमी असा एकतर्फी कारभार सुरू होता. दंडवते यांच्या मनमानी कारभाराला जामखेडची जनता वैतागली होती.  दंडवते यांच्याकडून जनतेला होत असलेल्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी जामखेड शहर भाजपने आमदार प्रा राम शिंदे साहेबांकडे दंडवते यांच्या कारभाराची तक्रार केली होती. त्याची दखल घेत आमदार राम शिंदे साहेबांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची आज बदली केली. दंडवते यांची बदली होताच आनंदोत्सव म्हणून आम्ही फटाक्यांची आतिषबाजी केली, जामखेडकरांची जुलमी अधिकाऱ्यांपासून सुटका झाली, अशी प्रतिक्रिया भाजपचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांनी दिली.

दंडवतेंच्या जागी साळवे

मिनीनाथ दंडवते यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची बदली झाली आहे. ते 26 डिसेंबर 2022 रोजी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील, असे नगरविकास परिषदेच्या आदेशात म्हटले.