चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, खर्डा पोलिसांची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई खर्डा पोलिसांनी पार पाडली आहे. सदर आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. ती आज संपली आहे.

Accused in the crime of theft arrested, Kharda police strike action

खर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील नळीवडगाव (ता भुम) येथील रहिवासी 70 वर्षीय काशीबाई सुखदेव राउत ह्या खर्डा शहरातील बाहुबली साडी सेंटरमध्ये साडी घेण्यासाठी आल्या होत्या, त्या जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होती. ही घटना 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता घडली होती.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता भूम) येथील रोहन त्रिंबक ठाकरे याने सदर चोरी केली असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून खर्डा पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार खर्डा पोलिसांनी रोहन ठाकरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असत, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, त्याची पोलिस कोठडी आज संपली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस काँस्टेबल म्हस्के, अशोक बडे यांच्या पथकाने केली.