युवा नेते संतोष नवलाखा यांची तालुकाध्यक्षपदी निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाच्या (AAP) जामखेड तालुकाध्यक्षपदी धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष नवलाखा (Santosh Navlakha) यांची निवड करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवलाखा यांच्या खांद्यावर पक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजितभाऊ फाटके पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आघाव यांनी संतोष नवलाखा यांची निवड घोषित केली.

Youth leader Santosh Navlakha elected as Jamkhed taluka president of Aam Aadmi Party,

जामखेड शहरातील धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष नवलाखा हे गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे.त्यांची अनेक अंदोलने गाजली आहे. त्यांच्या अंदोलनाचा अनेकांना दणका बसला आहे. गोर गरिब, दीन दलित, वंचित उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी 2018 साली आम आदमी पक्षात प्रवेश केला.गेल्या सहा सात वर्षांत त्यांनी पक्षाच्या माध्यमांतून अनेक प्रश्नांवर आवाज उठवला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ध्येय धोरणे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. नवलाखा यांची धडपड पाहून पक्षाने त्यांच्या खांद्यावर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांनी या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाने (AAP) अहमदनगर जिल्ह्यात पक्ष आणि संघटन बांधणी हाती घेतली आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी संतोष नवलाखा यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील व जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आघाव यांच्या मार्गदर्शनानुसार आम आदमी पार्टीचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जाणार आहे तसेच विविध लोकहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवलाखा यांनी निवडीनंतर सांगितले.

आम आदमी पक्षाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी संतोष नवलाखा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ आघाव, उपअध्यक्ष राजेंद्र नागवडे, शरद शिंदे, शहर अध्यक्ष भरत खकाळ मेजर, जिल्हा संघटक सुभाष केकान, महासचिव प्रकाश फराटे , सचिव प्रा.अशोक डोंगरे, जिल्हा प्रवक्ते ॲड महेश शिंदे, ॲड बिपिन वारे,अजय भोसले, सुंदर परदेशी, गोकुळ शेठ परदेशी, दिपक शेळके, ऋषिकेश गांगर्डे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

shital collection jamkhed