RR vs LSG Match Result today : राजस्थान राॅयल्सने लखनऊ सुपर जायंटवर मिळवला दणदणीत विजय !

RR vs LSG Match Result today : राजस्थान राॅयल्सने लखनऊ सुपर जायंटसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात राजस्थान राॅयल्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत लखनऊ सुपर जायंटच्या फलंदाजांना रोखून धरले. कर्णधार के एल राहूल आणि विस्फोटक फलंदाज निकोलस पुरन यांनी अर्धशतके झळकावली पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. राजस्थान राॅयल्सने लखनऊ सुपर जायंटचा 20 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 च्या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

RR vs LSG Match Result today, Rajasthan Royals resounding victory over Lucknow Super Giants, RR win today, IPL 2024 LATEST UPDATE,

संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वातील राजस्थान (RR) संघानं यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानं केली आहे. राजस्थान संघाने लखनौचा (LSG) 20 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 173 धावांपर्यंत मजल मारु शकला. लखनौकडून निकोलस पूरन आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी अर्धशतकं ठोकली, पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

राजस्थाननं दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 11 धावांवर लखनौनं आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. क्विंटन डी कॉक फक्त चार धावा काढून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कल याला खातेही उघडता आले नाही.आयुष बडोनी फक्त एक धाव काढून बाद झाला. 3.1 षटकात 11 धावांमध्ये लखनौनं महत्वाच्या तीन फलंदाजांना गमवालं होतं.

आघाडीची फळी कोसळल्यानंतर कर्णधार केएल राहुल यानं लखनौचा डाव सावरला. राहुल यानं फटकेबाजी करत लखनौच्या आशा जिवंत ठेवल्या. केएल राहुल यानं 58 धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. केएल राहुल यानं 44 चेंडूमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 58 धावांचे योगदान दिलं. केएल राहुल यानं दीपक हुड्डाच्या साथीनं डाव सावरला. दोघांनी 26 चेंडूमध्ये 49 धावांची महत्वाची भागिदारी केली. पण मोक्याच्यी क्षणी दीपक हुड्डा बाद झाला. दीपक हुड्डा यानं 13 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा पाऊस पाडला.

दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर निकोलस पूरन यानं आक्रमक रुप घेतलं. पूरन यानं राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पूरन आणि केएल राहुल यांनी लखनौला विजयाच्या आशा जिवंत केल्या. पण राहुल बाद झाल्यानंतर लखनौची अवस्था अधिक बिकट झाली. केएल राहुल आणि निकोलस पूरन यांनी 52 चेंडूमध्ये झटपट 85 धावांची भागिदारी केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. निकोलस पूरन यानं आक्रमक खेळी करत धावांचा पाऊस पाडला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

केएल राहुल बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिसही झटपट तंबूत परतला. स्टॉयनिस फक्त तीन धावांवर अश्विनच्या चेंडूवर बाद झाला. अखेरीस निकोलस पूरन यानं कृणाल पांड्याच्या साथीनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण राजस्थानने बाजी मारली. निकोलस पूरन अखेरपर्यंत लढला, पण इतरांकडून हवीतशी साथ न मिळाल्यामुळे लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. निकोलस पूरन यानं 41 चेंडूमध्ये नाबाद 64 धावांची खेळी केली. यामध्ये चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. कृणाल पांड्या चार धावांवर नाबाद राहिला.

ट्रेंट बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं राजस्थानच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवाय नांद्रे बर्गर, आर. अश्विन, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. आवेश खान याला विकेट मिळाली नाही.पण आवेश खानने शेवटच्या षटकांत भेदक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

आयपीएलच्या 17 व्या सिजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. राजस्थान राॅयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट यांच्यात सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्सने फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 82 धावा गेल्या. त्यानंतर रियान परागने 29 चेंडूत 43 धावा चोपल्या. त्याचबरोबर ध्रुव जुरेल यानेही फटकेबाजी केली. त्याने 12 चेंडूत 20 धावा केल्या.

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 12 चेंडूत 24 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. जो बटलर हा स्वस्तात बाद झाला त्याने 11 धावा केल्या. त्यानंतर संजु सॅमसन आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरला.संजु सॅमसन आणि रियान पराग यांनी  93 धावांची भागीदारी करत संघाची पडझड रोखली आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली. राजस्थानने चार विकेट्सच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. लखनऊ समोर राजस्थानचे विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले होते.