GT vs MI Match Results Today : आयपील हंगामाचा पहिला सामना गमावण्याची मुंबईची परंपरा कायम, हारलेला सामना गुजरातने जिंकला, गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला लोळवले !

GT vs MI Match Results Today : गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा डाव 162 धावांवर अटोपला.गुजरातच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या झटपट विकेट्स घेतल्या.या सामन्यात गुजरातने मुंबईचा 6 धावांनी पराभव केला.गुजरातने यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात केली.तर मुंबईवर आयपीएल हंगामाचा पहिला सामना गमावण्याची नामुष्की ओढवली. सलग 12 सामन्यात मुंबईला हंगामाच्या सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2024 Latest news in marathi)

GT vs MI Match Results Today, Mumbai's tradition of losing the first match of IPL season continues, Gujarat wins the lost match, Gujarat bowlers thrash Mumbai Indians,

मुंबईकडून इमपॅक्ट डेवाल्ड ब्रेव्हिस याने सर्वाधिक 46 धावा केल्या. डेवाल्डच्या या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. रोहित शर्मा याने 29 बॉलमध्ये 43 धावांचं योगदान दिलं. तिलक वर्मा याने 25 धावा जोडल्या. नमन धीर याने 20 रन्स केल्या. तर टीम डेव्हिड 11 धावांवर तर कर्णधार हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला. (GT vs MI Match Highlights Today)

मुंबईचा विजय आवाक्यात असताना हार्दिक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मुंबई सहज विजयी होईल असे वाटत असतानाच गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या झटपट विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबई संघाला शेवटच्या षटकांत 6 धावांनी पराभवास सामोरे जावे लागले.

गुजरातकडून मोहित शर्मा, उमेश यादव, अझमतुल्लाह उमरजाई, जॉन्सन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर साई किशोरने 1 विकेट्स घेतली.कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने पहिला विजय मिळवला.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 19, कॅप्टन शुबमन गिल 31, साई सुदर्शन 45, अझमतुल्लाह 17, डेव्हिड मिलर 12, विजय शंकर 6, राहुल तेवतिया 22 आणि राशिद खान 4 अशा धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स घेतल्या. गेराल्ड कोएत्झी याने दोघांची विकेट काढली. तर पीयूष चावलाने 1 विकेट घेतली.

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.