IPL 2024 latest Update : लोकसभा निवडणुकीमुळे IPL सामने होणार भारताबाहेर ? बीसीसीआयच्या हालचालींना आला वेग !

IPL 2024 latest Update : पुढच्या आठवड्यापासून आयपीएलच्या 17 व्या सीजनला सुरुवात होणार आहे.लोकसभा निवडणुका (Lok Sabha election 2024) होणार असल्यामुळे आयपीएलचे सर्व सामने भारतात (India) होण्याची शक्यता कमी आहे.आयपीएल (ipl 2024 schedule) पुर्ण शेड्यूल अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. बीसीसीआयने (BCCI) फक्त 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा यापुर्वी केली आहे. बीसीसीआय आयपीएलचा दुसरा हाफ UAE मध्ये आयोजित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. TOI ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

IPL 2024 Latest Update, Will IPL matches be held outside India due to Lok Sabha elections 2024? BCCI's movements gained momentum

निवडणूक आयोग शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. त्यानंतर आयपीएलच्या उर्वरित शेड्यूलमधील सामन्याबाबत घोषणा होईल. निवडणुकीमुळे बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच बीसीसीआय आयपीएलचे आयोजन देशाबाहेर करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी सध्या UAE मध्ये आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने भारताबाहेर आयोजित करण्याचा विचार सुरु आहे.

बीसीसीआयने 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतच्या मॅचच शेड्यूल जाहीर केलय.अन्य सामन्यांची अजून प्रतिक्षा आहे. दुसरा हाफ बाहेर आयोजित होऊ शकतो. कदाचित पुन्हा आयपीएलचा शेवटचा फेज भारतात होऊ शकतो. म्हणजे प्लेऑफ आणि फायनल.

दरवेळी लोकसभा निवडणुकीच्या काळात आयपीएलच्या आयोजनात अडथळे येतात. 2009 मध्ये आयपीएलचा संपूर्ण दुसरा सीजन दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीच्या काळात आयपीएलच्या पहिल्या हाफच आयोजन भारतात तर दुसरा हाफ यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. 2019 मध्ये लोकसभा निवडणुका असूनही संपूर्ण सीजन भारतातच आयोजित झाला होता. कोविडच्या काळातही बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये केले होते.

आयपीएलच्या 17 व्या सिजनचे संपुर्ण शेड्यूल कधी जाहीर होणार ? आयपीएलचे संपुर्ण सामने भारतात आयोजित होणार का ? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.