गोळीबाराच्या घटनेने जामखेड तालुका हादरला, गोळीबारात एक जण जखमी, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Patoda Jamkhed firing News : शनिवारी मध्यरात्री जामखेड तालुका गोळीबाराच्या (Jamkhed firing) घटनेने हादरून गेला. या घटनेत एक जण गंभीर जखमी (seriously injured) झाला आहे. त्याच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथे उपचार (Treatment) सुरु आहेत. ही घटना जामखेड तालुक्यातील पाटोदा (ग) येथे घडली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत पाटोदा येथील ऊसतोड मुकादम आबेद पठाण (Abed Pathan) जखमी झाले आहेत. (Patoda Jamkhed firing incident)

Jamkhed taluka rocked by firing incident, Abed Pathan injured in firing, case registered against two for attempted murder, Patoda Jamkhed firing incident

दीड वर्षापुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून ऊसतोड मुकादम आबेद पठाण यांच्यावर सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे – Akshay – Chingya Vishwanath More (रा.पाटोदा गरडाचे) यांने आपल्या साथीदारांसह गोळीबार केला. यावेळी चिंग्याने आबेद पठाणवर तीन राऊंड फायर केले. यातील एक गोळी पठाण यांच्या पायावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजता पाटोदा (ग) गावात घडली. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी पठाण यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत.

पाटोदा येथील आबेद पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम करतात. दीड वर्षापुर्वी त्यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड कामगार कामाला होता. लक्ष्मण काळे याला आर्थिक कारणावरून चिंग्याने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी चिंग्याविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीड वर्षापुर्वी दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा.पाटोदा गरडाचे) ऊसतोड मुकादम आबेद पठाण यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पठाण जखमी झाले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरिक्षक महेश पाटील, सपोनी गौतम तायडे, पोसई अनिल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेतील आरोपी हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान या प्रकरणी आबेद बाबुलाल पठाण वय 40 वर्ष रा.पाटोदा (ग)ता. जामखेड जि.अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा.पाटोदा (ग) जामखेड व एक अनोळखी इसम अश्या दोघांविरोधात कलम 07, 504 आर्म 3/25 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे करत आहेत.

कोण आहे अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे ?

अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा.पाटोदा गरडाचे येथील रहिवासी असलेला सराईत गुन्हेगार आहे. पाच वर्षापुर्वी संपुर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणात चिंग्या हा आरोपी होता. दुहेरी हत्याकांड प्रकरणात अल्पवयीन आरोपी म्हणून त्याचा समावेश होता. या प्रकरणाचा मागील वर्षी निकाल लागला त्यात तो निर्दोष सुटला खरा पण त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरुच होती. त्याच्याविरोधात जामखेड पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

चिंग्याचा पोशिंदा कलाकेंद्र चालक ?

सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरातील एका कलाकेंद्र चालकाच्या सोबत वावरताना नजरेस पडत होता. चिंग्याचा पोशिंदा तो कलाकेंद्र चालक असल्याची चर्चा आहे. आरोपी चिंग्या हा संबंधित कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.पोलिस त्या कलाकेंद्र चालकाविरुद्ध कठोर कारवाई करणार का ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

चौकशीसाठी तिघे जण ताब्यात

पाटोदा गोळीबार प्रकरणाची जामखेड पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात पोलिसांनी दोन ते तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. जामखेड शहरातील कलाकेंद्र हे गुन्हेगार पोसण्याचे अड्डे बनू लागले आहेत. पोलिसांनी हे अड्डे उद्ध्वस्त करण्याबरोबरच सराईत गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.

shital collection jamkhed