भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील एका नेत्याला उत्तर प्रदेशात उमेदवारी

Lok Sabha Elections 2024 BJP Candidates List : मिशन ३७० चे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपने शनिवारी लोकसभा निवडणूक 2024चे रणशिंग फुंकले. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 195 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (BJP National General Secretary Vinod Tawde)आणि इतर प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.

Kripashankar Singh news, BJP announces list of 195 candidates for Lok Sabha elections 2024, nomination of a leader from Maharashtra for Uttar Pradesh,

भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एटा येथून राजवीर सिंह, अमेठी येथून स्मृती इरानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

“राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात 29 फेब्रुवारीला अंतिम चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 195 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

“उत्तर प्रदेशच्या 55 जागांची आम्ही घोषणा करत आहोत, प. बंगालच्या 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची आम्ही घोषणा करत आहोत”, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

“वाराणसी येथून नरेंद्र मोदी, अंदमान निकोबार येथून बिष्णू पडा रे, अरुणाचल प्रदेश पूर्व किरण रिजिजू, अरुणाचल प्रदेश पश्चिममधून तापिर गाओ, आसाम करिमगंजमधून अनुसूचित जातीकडून कृपानाथ मल्ला, सिलचरमधून परिमल शुक्ला बैद्य, ऑटोनमस जिल्हा शेड्यूल ट्राईब अरमसिंग इसो अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini), स्मृती इराणी (Smriti Irani) तसेच अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) आणि मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांची नावं या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.”

अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणार आहेत. स्मृती इराणी या अमेठी या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार आहेत. तसेच गोरखपूरमधून रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय. अभिनेते मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दोन दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरविण्याबाबत चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीला उपस्थित होते. रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज भाजपकडून अधिकृत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एका नेत्याला थेट उत्तर प्रदेशच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या राजकारणात उत्तर भारतीयांचा चेहरा असलेल्या कृपाशंकर सिंघ यांना भाजपने उत्तर प्रदेशातील जौनपुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

कृपाशंकर सिंघ हे एकेकाळी कॉंग्रेस पक्षात होते. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहे. मुंबई शहराच्या राजकारणात त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी महत्वाची भूमिका बजावली. कॉंग्रेसची सत्ता जाताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले आहे.

लोकसभा निवडणूक 2024 भाजप उमेदवारांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी – वाराणसी
अमित शाह – गांधीनगर (गुजरात)
शिवराज सिंह चौहान – विदिशा (मध्य प्रदेश)
स्मृती इराणी – अमेठी (उत्तर प्रदेश)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह – लखनौ (उत्तर प्रदेश)
बन्सुरी स्वराज (सुषमा स्वराज यांच्या कन्या) – नवी दिल्ली
हेमा मालिनी – मथुरा (उत्तर प्रदेश)
आरोग्यमंत्री मनसुख मांडविय – पोरबंदरमधून (गुजरात)
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – गुना (मध्य प्रदेश)
किरन रिजिजू, तापीर गाओ – अरुणाचल प्रदेश
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव – अलवर (राजस्थान)
केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन – अटिंगल
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर – तिरुअनंतपुरम
कमलजीत सेहरावत – पश्चिम दिल्ली
रामवीर सिंग बिधुरी – दक्षिण दिल्ली
प्रवीण खंडेलवाल – चांदनी चौक (दिल्ली)
मनोज तिवारी – ईशान्य दिल्ली
माजी मुख्यमंत्री बिप्लब देब – त्रिपुरा
आसामचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल- दिब्रुगड