CRIME NEWS JAMKHED | ट्रॅव्हल्समधून महिला डॉक्टरचे दागिने व रोख रक्कम चोरीला; दोघांवर गुन्हे दाखल !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । CRIME NEWS JAMKHED | ट्रॅव्हल्सने प्रवास करत असलेल्या एका महिला डाॅक्टरचे दागिणे व इतर साहित्य चोरी जाण्याची घटना आज उघडकीस आली.याप्रकरणी दोघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , केज तालुक्यातील 29 वर्षीय महिला डाॅक्टर अमोल ट्रॅव्हल्स एजन्सीच्या MH 23 AUU 6565 या ट्रॅव्हल्सने प्रवास करत होती.

या प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स डिकीमध्ये बॅगमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे चोरी होण्याची घटना घडली. ही घटना जामखेडमध्ये उघडकीस आली.(Theft of female doctor’s jewelery and cash from Travels; Filed charges against both)

ट्रॅव्हल्स मालक श्रावण दगडू मोहळकर व क्लिनर मुक्तार शेख या दोघांनी संगनमत करून सुमारे 36500 रूपयांचा मुद्देमाल चोरला.ही घटना आज पहाटे उघडकीस आली.

दरम्यान ट्रॅव्हल्सच्या डिकीत ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरी झाल्याची बाब उघडकीस येताच डाॅ क्रांती अमोल घुले यांनी ट्रॅव्हल्स मालक श्रावण दगडू मोहळकर व क्लिनर मुक्तार शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

जामखेड पोलिस स्टेशनला कलम 379 प्रमाणे दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक फौजदार गाडे हे करत आहेत.