Gram Panchayat By-Election 2021 Jamkhed Taluka | जवळा आणि नायगावात होणार चुरशीचा सामना !

सत्तार शेख | जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Gram Panchayat By-Election 2021 Jamkhed Taluka | जामखेड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातील आघी आणि सावरगावच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र नायगाव आणि जवळा येथील निवडणूका होणार असल्याचे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले आहे.

आज 09 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. नायगाव आणि जवळ्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही गावात बर्‍याच जोरबैठका पार पडल्या. मात्र राजकीय कुरघोडीत माघार कोणी घ्यायची यावरून राजकारण तापले. यातून समेट होण्याऐवजी ताणून धरले गेले. मात्र काहींनी माघार घेतली तर काहींनी निवडणूक लढवायचीच हा पक्का इरादा ठेवला त्यामुळे जवळा आणि नायगावात निवडणूकीचे धुमशान रंगणार आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने माघार घेतली. या ठिकाणी दोन जणांमध्ये चुरशीची लढत होईल. या निवडणूकीत अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रंगीत तालीम करण्याची संधी येथील पुढाऱ्यांकडून होईल असेच दिसत आहे.

21 रोजी मतदान

जामखेड तालुक्यात पार पडत असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 21 रोजी मतदान होणार आहे. जवळा आणि नायगावात हे मतदान होईल. येथे एका एका जागेसाठी निवडणूक होत आहे. 22 डिसेंबर रोजी मतदान होईल.

सावरगाव आघीत बिनविरोध

सावरगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग १ मधील अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी योगेश दत्तात्रय वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी साधना कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळ आघी व सावरगाव येथील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

Gram Panchayat By-Election 2021 Jamkhed Taluka