Latur crime News Today, Rohan Ujalambe Murder Case | भरदिवसा रस्त्यावर पडला रक्ताचा सडा, कोयत्याने सपासप वार करून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Latur Crime News Today, Rahul Ujalambe Murder Case | लातूर शहरातून रविवारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील विशाल नगर भागातील साई मंदिर परिसरात भरदुपारी रक्ताचा सडा पडला. या घटनेत एका 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेने लातुर जिल्हात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लातूर शहरातील विशाल नगर भागात श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. (Latur Crime News Today, Rahul Ujalambe Murder Case)

रोहन सुरेश उजळंबे (वय 19, रा. मोती नगर, लातूर) (Rahul Suresh Ujalambe murder case) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर उभा असलेल्या राहुलवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.(Latur Crime News Today, Rahul Ujalambe Murder Case)

त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून इतर हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत आहे.

दरम्यान भरदुपारी विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याने लातूर जिल्हा हादरून गेला आहे. मयत राहूलचा खून कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा लातूर पोलिस वेगाने तपास करत आहेत. (Latur Crime News Today,Rahul Ujalambe Murder Case)