आता कर्जत – जामखेडचे पोलिस होणार वेगवान !

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत व जामखेड मतदारसंघातील पोलिस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने  दाखल होणार आहेत. या वाहनांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते  व पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गुरूवारी लोकार्पण करण्यात आले आहे.

https://youtu.be/fXgwsPmhFW4

कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमांतुन सीएसार निधीतून ही वाहने आमदार रोहित पवार यांनी कर्जत – जामखेड पोलिस दलाला भेट दिली आहेत. जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यातील पोलिस दलाकडे जुनी वाहने असल्याने पोलिसांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. आता नव्याने दाखल होणार्या वाहनांमुळे कर्जत व जामखेडचे पोलिस वेगवान होणार आहेत. रूबाबदार अत्याधुनिक वाहनांचा पोलिस दलाच्या तफ्यात होणारा समावेश दोन्ही तालुक्यातील पोलिस दलाचा रूबाब वाढवणारा ठरणार आहे.  रोहित पवारांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाची आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे रोहित पवारांनी पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित पवारांनी हाती घेतलेला उपक्रम राज्यातील विविध मतदारसंघात राबवण्यासाठी आता इतर आमदारही सरसावणार असेच दिसत आहे.