आमदार प्रा राम शिंदे यांचा दणका : कार्यकारी अभियंत्यावर होणार मोठी कारवाई, सीना धरणातून आज आवर्तन सुटणार, टंचाई आढावा बैठकीत शिंदे यांनी गाजवला सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून आवर्तन सोडावे यासाठी आक्रमक झालेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीला आज (12 रोजी) मोठे यश आले आहे. जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत शिंदे यांनी सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा गाजवला. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तात्काळ सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Due to MLA Prof. Ram Shinde's blow major action will be taken against Executive Engineer, water circulation will be released from Sina Dam today, scarcity review meeting Shinde raised issue of Sina Dam water circulation

आज १२ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक झाल्याचे दिसून आले. सीना धरणात पाणी शिल्लक असतानाही कार्यकारी अभियंता देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले. जनतेसह शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान केले. शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित करत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, आज झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सीना धरणातून आजच्या आज आवर्तन सोडण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता श्री देशमुख यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

कर्जत तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. सीना धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात चांगला पाणी साठी झाला. सध्या सीना धरणावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी आणि नागरिक पाणी टंचाईचा सामना करत आहेत. सीना धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी सातत्याने होत होती. पण कार्यकारी अभियंता देशमुख हे पाणी नसल्याचे कारण देत शेतकरी व लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत होते. याबाबत आमदार प्रा.राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत आक्रमक होत आवाज उठवला.

Due to MLA Prof. Ram Shinde's blow major action will be taken against Executive Engineer, water circulation will be released from Sina Dam today, scarcity review meeting Shinde raised issue of Sina Dam water circulation

आमदार शिंदे यांनी शेतकरी हितासाठी टंचाई आढावा बैठकीत आक्रमक भूमिका घेत सीना धरणातून आवर्तन सोडण्याची जोरदार मागणी केली. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सीना धरणातून आजच्या आज पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आमदार शिंदे यांच्या माध्यमांतून पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीना धरणातून आवर्तन सुटणार असल्याची बातमी लाभक्षेत्रातील शेतकरी नागरिकांमध्ये धडकताच शेतकऱ्यांकडून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानण्यात आले.

टंचाई आढावा बैठकीनंतर आमदार प्रा राम शिंदे काय म्हणाले ?

mahayuti government Big action against officer who misled government, executive engineer Kiran Deshmukh suspended, MLA Ram Shinde's blow

दरम्यान, टंचाई आढावा बैठकीनंतर बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, सीना डॅम , निमगाव गांगर्डा ता.कर्जत मधून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आजच्या आज पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे, आज आवर्तन सोडण्यात येणार आहे.तसेच आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिशाभूल केली व खोटी उत्तरे दिली आणि पाणी शिल्लक असुन देखील शेतकऱ्यांना वेटीस धरले व शेतकऱ्यांचे नुकसान केले.शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला त्रास दिल्यास आता कोणाचीच सुट्टी नाही

mahayuti government Big action against officer who misled government, executive engineer Kiran Deshmukh suspended, MLA Ram Shinde's blow

शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात आमदार प्रा राम शिंदे हे नेहमी आक्रमक झाल्याचे दिसून येते. आमदार शिंदे यांनी विधानपरिषद आवाज उठवत 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले होते. आता टंचाई काळात शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सीना धरण कार्यकारी अभियंता देशमुख यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई होणार आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. अधिकाऱ्यांनी जर शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला त्रास दिल्यास आमदार राम शिंदे यांच्याकडे सुट्टी नाही, हाच संदेश या कारवाईतून जनतेत गेला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

shital collection jamkhed