पिंपरखेड सोसायटीत यंंदा परिवर्तन होणारच  – बापूराव ढवळे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  । सत्तार शेख । पाच वर्षे सोसायटीची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पिंपरखेडमध्ये जिल्हा बँकेची शाखा आणतो, त्याचबरोबर पाच वर्षात सोसायटीची सुसज्ज इमारत उभारू असे सांगत सध्या पिंपरखेड सोसायटी तोट्याचा असून, ती नफ्यात आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलला विजयी करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेते बापूराव ढवळे यांनी केले.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पिंपरखेड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीमध्ये दोन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनेलने आज प्रचाराचा नारळ फोडत निवडणुकीचे रणसिंग फुंकले.

पिंपरखेड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाविरोधात स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलने जोरदार आव्हान उभे केले आहे. पतंग या चिन्हावर स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवत आहे.

सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराला सोसायटीचे सभासद वैतागले आहेत, सभासद परिवर्तनाच्या मूडमध्ये असुुन यंदाच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणारच असा दावा स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलने केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलने बुढणशाहवली दर्ग्यात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी स्वाभिमानी पॅनलने गावातून जंगी रॅली काढली होती. त्यानंतर स्वाभिमानीची प्रचार सभा पार पडली.

पहा स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनलची प्रचारसभा

यावेळी सरपंच बापुराव ढवळे, राजेंद्र ओमासे, भागुजी कदम, श्रीराम ओमासे,गुलाबराव घाडगे,अंबादास ढवळे, शहाजी मस्के, उपसरपंच अविनाश गायकवाड, मकबूल शेख, नजीर सय्यद, तुळशीराम ढवळे, अंबर लबडे, सूर्यकांत कदम, बाळासाहेब कारंडे, बापूसाहेब शिंदे, फय्याज शेख, बाबासाहेब ढवळे, तात्याराम लबडे, संतोष आधुरे, नितीन चोरगे, शिवाजी ओमासे, नंदकुमार काळे, बबन कारंडे, डाॅ प्रकाश कारंडे, रंभाजी आधुरे, नामदेव भोळे, शरद ओमासे, मच्छिंद्र आधुरे, अशोक लबडे, पांडुरंग लबडे, जनार्धन लबडे, भागवत ओमासे, भागवत कदम, बबन ओमासे, गोरख ओमासे, बाबासाहेब मस्के, रामदास कारंडे, गहिनीनाथ सातपुते,दादासाहेब नागरगोजे, अशोक खाडे, अनिल आजबे, नानासाहेब ढवळे, अस्लम शेख, झुंबर भिवरकर, अक्षय ढवळे, अजिनाथ डोंगरे, धनु पाटील, राजु शेख, सह सर्व उमेदवार आणि आदी मान्यवर उपस्थित होते.