सामाजिक कार्याचा सराव करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची भूमिका महत्वपूर्ण  – डाॅ गोरक्ष ससाणे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आजच्या वैज्ञानिक व यांत्रिक युगात श्रमदानाचे महत्व कमी होत चालले आहे.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कारांचे बीजे आपल्यामध्ये रूजवावे, सामाजिक सलोखा राखावा, ग्रामीण भागाशी स्वत:ला जुळवून घ्यावे व आपला व्यक्तिमत्व विकास घडवावा असे प्रतिपादन हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

role of labor camps is important for practicing social work - Dr Goraksha Sasane, jamkhed news today,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या वतीने पिंपरखेड येथे 6 मार्च ते 12 मार्च या कालावधीत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी डाॅ ससाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा ओमासे ह्या होत्या. यावेळी उपसरपंच अविनाश गायकवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार प्रा. अरुण पाळंदे सह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ससाणे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी राबवला जातो. त्याबरोबर सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देण्याच्या उद्देशाने देशभरातील महाविद्यालयांमध्ये राबवला जातो. विद्यार्थ्यांनी समाजाचे दु:ख, वेदना, प्रश्न समजून घ्यावीत, त्यावर शाश्वत उत्तरे शोधण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची भूमिका महत्वाची ठरते.

कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून दिले. श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांमार्फत स्वच्छता अभियान, पर्यावरण जागृती, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, व्यसनमुक्ती जागरूकता, कृषिविषयक विषयतज्ञांची व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. अक्षदा जमादार यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. धनश्री खामकर यांनी केले.

shital collection jamkhed