Malegaon Bibtya News : “12 वर्षीय चिमुकल्याने केले बिबट्याला जेरबंद,” घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, “याला म्हणायचं धाडस, वाह रे पठ्ठ्या.. शाब्बास..” सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान वायरल !

Malegaon bibtya News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सर्वत्र वाढला आहे. लाॅकडाऊन नंतरच्या काळापासून यात मोठी वाढ झाली आहे. ज्या भागात बिबट्याचे कधीच वास्तव नव्हते अश्या भागांमध्ये सुध्दा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले.बिबट्या हा हिंस्र प्राणी असल्याने त्याची जनमाणसांत मोठी दहशत आहे. त्यामुळे बिबट्या (Malegaon leopard news today) दिसल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असतात.आता बिबट्याचा असाच एक व्हिडिओ वायरल झाला आहे, त्यात बिबट्या दिसत असला तरी त्यात एका चिमुकल्या मुलाच्या धाडसाचे, हिमतीचे, समयसुचकतेचे दर्शन झाल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. (Mohit Ahire Malegaon)

Malegaon Bibtya News, 12-year-old boy jailed leopard,  video of incident was captured on CCTV, dare to say it, Wow, well done, video is going viral on social media, Mohit Ahire Malegaon

महाराष्ट्रात बिबट्याचे राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे.मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचे रोज कुठे ना कुठे दर्शन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून समोर आली आहे.या घटनेत एक चिमुकला मुलगा बिबट्याला खोलीत जेरबंद करत असल्याचे समोर आले आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल असे दृश्य त्यात दिसत आहे.

नेमकी घटना काय ?

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला दरवाजाच्या शेजारी सोफ्यावर बसून मोबाईवर गेम खेळताना दिसत आहे. अचानक दरवाज्यातून बिबट्या आत शिरतो आणि थेट आतमध्ये जातो. चिमुकल्याला हे लक्षात येते तेव्हा तो वेळ न घालवता खोलीचा दरवाजा लावून बिबट्याला घरात जेरबंद करताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले. चिमुकल्याने दाखवलेल्या धाडसाचे, हिमतीचे आणि समयसुचकतेचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होऊ लागले आहे.

मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका बंद असलेल्या लाँजच्या ऑफिसमध्ये मोहित अहिरे हा 12 वर्षीय चिमुकला मुलगा सोफ्यावर बसून गेम खेळत होता. त्याचवेळी बिबट्या लाॅजमध्ये शिराला, बिबट्या सरळ दुसर्‍या खोलीत जात होता. यावेळी चिमुकल्याने कुठलाही आरडाओरड न करता, बिबट्याला पाहताच क्षणी मोबाईल बाजूला ठेवून तडक दरवाजा गाठला. या प्रसंगी घाबरुन न जाता मोठ्या धाडसानं त्या चिमुकल्याने लाॅजचा दरवाजा बाहेरुन लावून घेतला आणि घर गाठले. बिबट्या लाॅजमध्ये शिरला असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केला.

चिमुकल्या मोहित अहिरेच्या शौर्याला सलाम

मोहित अहिरे या 12 वर्षीय चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले. त्याने दाखवलेल्या या धाडसाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. मोहित आहिरे या चिमुकल्याने जर धाडस नसते दाखवले नसते तर तो बिबट्याच्या तावडीत सापडला असता.त्याच्या हिंमतीमुळे त्याच्याबरोबर इतरांचाही जीव वाचला.त्याने जर डोकं लावून हे पाऊल उचललं नसतं.तर बिबट्या रस्त्यावर मोकाट फिरत बसला असता, ज्यामुळे गावकऱ्यांच्या आणि इतर पाळीव प्राण्यांच्याही जीवाला धोका झाला असता.

पण मोहित आहिरे या चिमुकल्यानं दाखवलेले धैर्य आणि धाडसामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मोहितने दाखवलेल्या शौर्याची जोरदार चर्चा आता महाराष्ट्रात रंगली आहे. याला म्हणतात धाडस, वाह पठ्ठ्या.. शाब्बास..! अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

घटनेनंतर मोहित आहिरे काय म्हणाला ?

मोहित म्हणाला, ”ऑफिसमध्ये बिबट्या घुसला, त्याला पाहताच मी फोन घेऊन तिथून उठलो आणि बाहेरुन कडी लावून घेतली.” “पुढे तो म्हणाला की बाबांना त्याने सगळं सांगितलं ज्यानंतर त्यांनी मालकाला फोन लावला आणि मग सगळे लोक इथे जमले.” ला भीती वाटली नाही का? असं मोहितला विचारले असता,”थोडी भीती मला वाटली. असं मोहित म्हणाला.”

पहा Video बिबट्याला जेरबंद करताना चिमुकला