जवळा ग्रामपंचायतवर प्रशांत शिंदेंचा कब्जा, शेतकरी ग्रामविकास आघाडीचा दारूण पराभव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी आणि मुंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. सर्वपक्षीयांना पराभवाची धुळ चारत प्रशांत शिंदे यांनी जवळा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला. जवळ्यातील जनतेने धनशक्तीला नाकारत प्रशांत शिंदे यांच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली. जवळा गावातील दिवंगत नेत्यांच्या पश्चात पहिल्यांदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमांतून जवळा गावातील जनतेने प्रशांत शिंदे यांच्या रूपाने आपला नेता निवडला. प्रशांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांना जनतेने भरभरून साथ दिली. सरपंचपदी सुशील सुभाष आव्हाड हे 650 मतांनी विजयी झाले. तर प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शितल शिंदे हे सर्वाधिक 315 मतांनी सदस्यपदी विजयी झाल्या.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले होते. येथील निवडणुकीत प्रशांत शिंदे विरूध्द सर्वपक्षीय नेते असा सामना झाला. सत्ताधारी जवळा ग्रामविकास पॅनल विरूध्द शेतकरी ग्रामविकास आघाडी अशी लढत झाली. या निवडणुकीत सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, कोल्हे गटाचे नेते दत्ताभाऊ कोल्हे, माजी सभापती सुभाष अव्हाड, माजी उपसभापती दिपक पाटील, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डाॅ महादेव पवार, दळवी गटाचे नेते प्रदिप दळवी, दशरथ हजारे गुरूजी, उमेश रोडे, गौतम कोल्हे, सह आदी दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिष्ठा पणाला लावत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशांत शिंदे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. सर्वपक्षीय नेत्यांना जनतेने साफ नाकारले. प्रशांत शिंदे यांच्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती हे आजच्या निकालातून स्पष्ट होत आहे. प्रशांत शिंदे यांच्यासाठी सर्वसामान्य जनतेने जवळा ग्रामविकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता अशी चर्चा होती, ती आजच्या निकालातून सत्य झाली. जवळा ग्रामविकास पॅनलने सरपंच पदाच्या उमेदवारासह सदस्यपदाच्या दहा जागा जिंकल्या. विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार खालील प्रमाणे

सरपंचपदाचे विजयी उमेदवार  – सुशिल सुभाष आव्हाड  ( 1003 मतांनी विजयी )

सदस्यपदाचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

प्रभाग 1 – शेतकरी ग्रामविकास आघाडी – 2  विजयी उमेदवार

1) प्रदिप दळवी  ( 11 मतांनी विजयी)
2)  पांडूरंग शिंदे  (48 मतांनी विजयी)

जवळा ग्रामविकास पॅनल –  1 विजयी उमेदवार

1) नंदा कल्याण आव्हाड  ( 2 मतांनी विजयी )

वार्ड 2- जवळा ग्रामविकास पॅनल –  3 उमेदवार विजयी

1) भाऊसाहेब  महारनवर  –  116 मतांनी विजयी
2) मंगल आव्हाड – 103 मतांनी विजयी
3) सोनाली वाळुंजकर  – 117 मतांनी विजयी

प्रभाग तीन शेतकरी ग्रामविकास आघाडी  –  3 उमेदवार विजयी

किसन सरोदे  ( 72 मतांनी विजयी )
प्रशांत पवार  (29 मतांनी विजयी )
सिताबाई पठाडे (189 मतांनी विजयी )

प्रभाग 4 – जवळा ग्रामविकास पॅनल  3 उमेदवार विजयी

1) हरिदास हजारे –  67 मतांनी विजयी
2) सारिका रोडे – 1 मतांनी विजयी
3) कोल्हे जयश्री – 72 मतांनी विजयी

प्रभाग 4 शेतकरी ग्रामविकास पराभूत उमेदवार

1) दशरथ हजारे गुरुजी 67 मतांनी पराभूत
2) पुजा उमेश रोडे – 1 मतांनी पराभूत
3) सोनाली गौतम कोल्हे – 72 मतांनी पराभूत

वार्ड 5 – जवळा ग्रामविकास पॅनल 3 उमेदवार विजयी

1) रफिक जमाल शेख – 251 मतांनी विजयी
2) शितल प्रशांत शिंदे –  315 मतांनी विजयी
3) राधिका मारूती हजारे – 204 मतांनी विजयी